नाली साफ सफाई करून मुरूम टाकून पत दिवे लावण्यात यावेत:-पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे
बीड शहरातील काझी नगर बालेपिर या ठिकाणी भरपूर लोकसंख्या आहे तरी त्या ठिकाणी आज पर्यंत रस्ता बनवण्यात आला नाही. नाल्या साप केल्या जात नाहीत व त्या ठिकाणी पथदिवे सुद्धा लावले जात नाहीत.
गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांची सत्ता आहे त्यांनी काय दिवे लावलेत हे यामधून निदर्शनास येत आहे सत्ता परिवर्तन होणे काळाची गरज आहे तोपर्यंत सर्वसामान्यांचे अडी अडचणी व जनसामान्यांचे प्रश्न सुटणार नाहीत.
काझी नगर बालेपिर या ठिकाणी पावसामुळे रस्त्यावर पूर्णपणे चिखल झालेला आहे व नाली साफ न केल्यामुळे नाली मधील सर्व घाण व पाणी हे रस्त्यावर येत आहे त्यामुळे तेथील नागरिकांना रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्या ठिकाणी रोडवर मुरूम टाकने व नाली साफ करणे पथदिवे लावावेत नगरपरिषद यांना ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे चार दिवसाच्या आत त्यांनी आमची मागणी मान्य जर नाही केली तर तेथील घाण नगर परिषद सिओ यांच्या केबिनमध्ये टाकून ऑल इंडिया पॅंथर सेना बीड जिल्ह्याच्या वतीने आंदोलन केले जाईल याची प्रशासनाने दखल घ्यावी.
Comments
Post a Comment