मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांना लाडकी बहीण योजनेसह महिलांसाठी लागू केलेल्या सर्व सवलती द्याव्यात - शेख आयेशा


बीड प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.यासह एसटी बस मध्ये महिलांना अर्ध्या तिकिटाची सवलत फ्री मध्ये सुरू आहे. मात्र महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांना सरकारने कोणतीही सवलत जाहीर केलेले नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तृतीयपंथीयांचे अधिकृत संख्या 1000 पेक्षा सुद्धा जास्त नसेल मात्र त्यांना समाजासह सरकार सुद्धा अपमानाचीच वागणूक देत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तात्काळ महाराष्ट्रातील तमाम तृतीय पंथीयांना लाडकी बहीण योजनेसह ज्या योजना महिलांसाठी लागू केलेल्या आहेत त्या सर्व योजनांचा लाभ तृतीयपंथीयांना मिळावा या संदर्भात शासन निर्णय घ्यावा अन्यथा मुख्यमंत्र्याच्या शासकीय वर्षा निवासस्थानासमोर तृतीयपंथीयांना घेऊन हाय हाय आंदोलन करण्याचा इशारा शेख आयेशा यांनी दिला आहे.
सरकार लाडक्या बहिणीसह लाडक्या भावांसाठी देखील विविध शासकीय योजना जाहीर करून अमलात आणत आहे. प्रामुख्याने विश्वकर्मा योजना, श्रम कार्ड योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियान आणि नवीन व्यवसायासाठी शासकीय कर्ज योजना लागू करण्यात आलेल्या आहेत. ही बाब नक्कीच अभिनंदनीय आहे.मात्र दुसरीकडे बोटावर मोजण्या एवढ्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रात असलेल्या तृतीयपंथीयांकडे मात्र सरकारने दुर्लक्ष केलेले आहे. तृतीय पंथीय समाजाकडे समाजाने तर बहिष्कृत केलेले आहेच. मात्र सरकारने तरी किमान त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी आणि लाडकी बहीण योजनेसह एसटी महामंडळामध्ये अर्ध्या तिकीट यासह विविध महिलांसाठी लागू केलेल्या सर्व शासकीय योजनांमध्ये तृतीय पंथीयांना देखील महिला गृहीत धरून विशेष बाब असा उल्लेख करून तृतीयपंथीयांना देखील या सर्व सवलती देण्यात याव्यात. 
तृतीय पंथीयांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे.íत्यांची मते घेऊन सत्तेच्या खुर्चीत बसणाऱ्यांना आनंद वाटतो. मात्र खुर्चीत बसल्यानंतर या तृतीयपंथीयांना देखील आपण सन्मान देणं हे आपलं कर्तव्य आहे याचा विसर सत्ताधाऱ्यांना का पडतो. महिलांना योजना लागू करत असताना यापुढे त्या सर्व योजना तृतीयपंथीयांना देखील लागू झाल्या पाहिजेत. अशी आमची आग्रही मागणी आहे.जर या निवेदनाची दखल राज्य सरकारने गांभीर्याने घेतली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आणि शासकीय मंत्रालयासमोर तमाम महाराष्ट्रातील तृतीयपंथी हाय - हाय आंदोलन करतील. अशा निवेदनाची मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना आश्रय सेवा केंद्राच्या वतीने पत्रकार शेख आयेशा यांनी दिले आहे.






Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी