कंत्राटी सफाई कामगारांनी एकत्र येऊन उपसले अन्नत्याग उपोषणाचे हत्यार
बीड ( प्रतिनिधी ) दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी आज अन्नत्याग उपोषणाचा सातवा दिवस.नगरपरिषद बीड कार्यासमोर दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी अन्न त्याग उपोषणाला सुरुवात केली. अन्न त्याग उपोषण करते भाई राजेश कुमार जोगदंड यांना भेटायला सर्व कंत्राटी सफाई कामगार एकवटला होता. यावेळी सफाई कामगार म्हणाले की आता माघार घ्यायची नाही सर्वजण एका ताकतीने भाई राजेश कुमार जोगदंड यांच्या मागे उभे राहू असा संकल्प करण्यात आला. कंत्राटी सफाई कामगारांनी किमान वेतना सहित प्रचलित कामगार कायद्याच्या सोयी - सुविधा मिळाव्यात म्हणून नगरपरिषद बीड कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले होते, त्याचा राग मनात धरून दिनांक ०१ जून २०२३ रोजी सकाळी कामावर आल्या बरोबर सफाई कामगारांना तोंडी सूचना देऊन अयोग्य व बेकायदेशीर रित्या कामावरून कमी केले. आज तब्बल 15 महिने होऊन गेले तरी कंत्राटी सफाई कामगारांना कामावर रुजू करून घेतले नाही. त्यामुळे संपूर्ण बीड शहरात घाणीचे साम्राज्य पसरले. कचऱ्याच्या घाणीने निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे बीड मधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील जिजामाता चौक, मसरत नगर व पद्मावती टेक्स्टाईल मार्केट जवळ नगरपालिकेच्या कचऱ्याचे ढीग पाहिले तर पुन्हा एकदा स्वच्छता भारत अभियानाचे प्रशस्तीपत्र थेट प्रधानमंत्री यांनी स्वतः बीडच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या पदरात टाकावे अशी खोचक प्रतिक्रिया शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. या गंभीर प्रश्नावर बीड विधान परिषदेचे आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योतीताई मेटे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन बीड शहरात तात्काळ स्वच्छता करण्याची विनंती केली होती. त्यावर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी येत्या आठ दिवसात घनकचरा व्यवस्थापन करण्यात येईल असे आश्वासन दिले होते, ते सुद्धा हवेत विरून गेले. रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांच्या झुंजार नेतृत्वाखाली मागील १५ महिन्यापासून घनकचरा व्यवस्थापनाकरिता कंत्राटी सफाई कामगारांना नोकरीच्या व पगाराच्या सलगतेसह पूर्ववत कामावर घेण्यासाठी लढा उभा केला. नगरपरिषद बीड यांनी शहरातील दररोज कचरा व स्वच्छता करणे आवश्यक असताना मागील पंधरा महिन्यापासून घंटागाडी कचरा संकलनासाठी येत नसल्यामुळे परिणामी शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे व नाल्या तुंबलेल्या दिसत आहेत, तर नागरिकांच्या घरोघरी कचऱ्याचे डबे भरून पडलेले आहेत. मा.ना. धनंजय मुंडे कृषी मंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री यांनी तात्काळ शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मनावर घेऊन सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे होता. तसा तो करण्यात आला नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. दिनांक १९ सप्टेंबर 2024 पासून नगरपरिषद बीड कार्यालयासमोर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेश कुमार जोगदंड यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे आज सातवा दिवस संपला तरीसुद्धा न्याय मिळालेला नाही मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर पासून संतप्त कंत्राटी सफाई कामगार नगरपरिषद कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत अचानकपणे टोकाची भूमिका घेतील असे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांना देऊन त्याच्या प्रतिलिपी संबंधित मंत्री महोदय सनदी अधिकारी जिल्हा प्रशासन यांना देण्यात आलेल्या आहेत. तेव्हा तात्काळ प्रकरणाचा निपटारा करावा अन्यथा होणाऱ्या अनुचित प्रकारास महाराष्ट्र शासन, प्रशासनातील सनदी अधिकारी, जिल्हा प्रशासन व मुख्याधिकारी नगरपरिषद बीड नीता अंधारे हेच जबाबदार राहतील.अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे रोजंदारी मजदुर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment