हरणाच्या पाडसाचे कुत्र्याच्या तावडीतून प्राण वाचवले; वनविभागाकडे सुपुर्त केले
लिंबागणेश:- बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील शिवम कल्याण कोकाटे यांच्या शेतात सोयाबीन काढत असताना हरणाच्या पाडसावर रानातील कुत्र्यांनी हल्ला केला असता कल्याण कोकाटे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी याची फोनवरून डॉ.गणेश ढवळे आणि पत्रकार हरीओम क्षीरसागर यांना कल्पना दिली. आम्ही दोघांनी पावसाने झालेल्या चिखलामुळे मोटार सायकल जात नसल्याने एक किलोमीटर चिखलातून जाऊन पाडसाला ताब्यात घेऊन बीड वनपरिक्षेत्र अधिकारी काकडे यांना फोन वरून कल्पना दिली. त्यांनी वनपाल अंगद बहिरवाळ यांना फोन वरून पाडसाला ताब्यात घेण्यास सांगितले.वनपाल अंगद बहिरवाळ यांच्या सांगण्यावरून वनविभागातील कर्मचारी अनिल शेळके, मधुकर वायभट, हनुमंत वायभट हे लिंबागणेश येथे डॉ.गणेश ढवळेंच्या घरी सायं ८ वाजता पोहोचले.अगोदरच
भेदरलेल्या पाडसाला डॉ.गणेश ढवळे यांनी घरी आणुन पाणी पाजले.त्यानंतर वनविभागाचे कर्मचा-यांना सुपुर्त करण्यात आले. यावेळी पत्रकार हरीओम क्षीरसागर,गणपत तागड, कल्याणबापु वाणी , बालासाहेब जाधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment