बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परळी विधानसभेचे लाडके युवराज पोहनेर येथील बौद्ध बांधवांना बौद्ध विहार बांधून देऊन न्याय देतील काय! - प्रेम जगतकर
परळी प्रतिनिधी -
परळी विधानसभेतील पोहनेर या गावाला माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी त्यांच्या कार्य काळामध्ये दत्तक घेतले होते या कार्यकाळामध्ये तेथील बौद्ध विहाराची दयनीय अवस्था झालेली असताना सुद्धा जाणून-बुजून बौद्ध विहाराच्या विकासाकडे दुर्लक्ष करून तेथील बौद्धांची फक्त मते घेण्यापुरता दोन वेळेस पायाभरणी सोहळा घेतला असे गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले . पण प्रत्यक्षात मात्र काम सुरू झाले नाही आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहता खालील फोटोतील बौद्ध विहाराची दयनीय झालेली अवस्था वंचित बहुजन आघाडी परळी विधानसभेच्या टीमने परळी विधानसभा मतदारसंघ अभियानाच्या निमित्ताने पोहनेर या गावी संपर्क साधण्यासाठी गेलो असता गावकऱ्यांच्या वतीने ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली व आम्हाला बौद्ध विहार बांधून देऊन न्याय द्या असा टाहो फोडण्यात आला.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे वंचित युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष राजेश सरवदे वंचित बहुजन युवक आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम जगतकर युवक आघाडी शहर उपाध्यक्ष शुद्धोधन आचार्य उपस्थित होते. त्यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या वतीने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परळी विधानसभेचे लाडके युवराज यांना सवाल करण्यात आला की ,पोहनेर येथील आमच्या बौद्ध बांधवांना संपूर्ण बौद्ध समाजाचे आदर्श असलेले भगवान गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या जयंती साजरी करण्यासाठी बौद्ध विहार बांधून मिळेल काय?
Comments
Post a Comment