जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत तुलसी इंग्लिश स्कूल उपविजेता
बास्केटबॉल विभागीय स्पर्धेसाठी तुलसी इंग्लिश स्कूल संघ पात्र
बीड प्रतिनिधी - तुलशी इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत चमकदारित कामगिरी करत, द्वितीय क्रमांक म्हणजेच उपविजेता ठरला आहे.संघाने दि.25 सप्टेंबर रोजी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल परळी येथे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत्या.यात तुलसी इंग्लिश स्कूल ने सहभाग नोंदवून जिल्ह्यात अंडर -17 या ग्रुप मध्ये प्रथम मॅच B.H.E.L इंग्लिश स्कूल परळी यांना एकतर्फी पराभूत करून द्वितीय फेरीत महावीर कोठारी विद्यालय कडा आष्टी या संघास पराभूत केले. तसेच सेमी फायनल मध्ये सिंधफणा पब्लिक स्कूल माजलगाव संघास एकतर्फी पराभूत करून फायनल मध्ये प्रवेश केला. फायनल मध्ये अटीतटीच्या सामन्यात चंपावती संघासोबत अवघ्या काही पॉइंट्स ने पराभव स्विकारावा लागला त्यामुळे तुलसी इंग्लिश स्कूल ने जिल्हा मध्ये द्वितीय येण्याचा मान पटकावला आहे. त्या सोबतच विभाग स्तरावर होणाऱ्या स्पर्धेस प्रवेश निश्चित केला आहे. या बद्दल संघातील स्पर्धक विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे प्राचार्य उमा जगतकर व शिक्षक वृंदांनी केले आहे.
Comments
Post a Comment