शासकीय नर्सिंग कॉलेज कडून नॅशनल कॉन्फरन्स चे आयोजन



२९ डिसेंबर रोजी हॉटेल नीलकमल येथे होणार कॉन्फरन्स

बीड (प्रतिनिधी) - शासकीय नर्सिंग कॉलेज कडून नॅशनल कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले असून दिनांक २९ डिसेंबर २०२३ शुक्रवार रोजी शहरातील हॉटेल नीलकमल येथे कॉन्फरन्स होणार आहे.
शासकीय नर्सिंग कॉलेज जिल्हा रुग्णालय बीड मार्फत नर्सिंग एज्युकेटरस् व नर्सिंग विद्यार्थ्यांकरिता नॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. कॉन्फरन्स दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ०८:०० ते संध्याकाळी ०६:०० पर्यंत चालणार आहे. या कॉन्फरन्सचा उद्‌घाटन समारंभ सकाळी ०९:०० वाजता होणार आहे. सदर उद्‌घाटन प्रसंगी आरोग्य उप‌संचालक, आरोग्य परिमंडळ लातूर डॉ. अर्चना भोसले, सहाय्यक संचालक (सुश्रुषा) मुंबई डॉ. निलीमा सोनवणे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक बडे, इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. अविनाश देशमांडे, डॉ. उज्वला वनवे, डॉ. शुभानंद शिंदे, डॉ. शोभा गायकवाड, डॉ. सुवर्णा बेदरे, श्रीमती रमा गिरी, श्रीमती क्षिरसागर शैलजा, शिला मोहीते, श्री. चिंचकर बी.डी., कदम अरूण यांच्यासह पत्रकार बांंधवांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कॉन्फरन्स करिता महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून शिक्षक व विद्यार्थी सहभागी होणार आहे. कॉन्फरन्स यशस्वी करण्यासाठी नर्सिंग कॉलेजचे सर्व शिक्षक उलका साळवे, प्रतिक जोशी, रोहन जोगदंड, सतीष बोराडे, श्रीमती रोहिनी शिनगारे या अथक परिश्रम करत आहेत.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी