भारतीय कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन कोलकत्ता येथे थाटात संपन्न- उबाळे, चव्हाण,परळकर
बीड(प्रतिनीधी):- आज दिनांक २८,२९,३० डिसेंबर रोजी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष मा.कॉ.सुभाषजी लांबा,महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्यध्यक्ष तथा केंद्रीय उपाध्यक्ष मा.उमेश चंद्र चीलबुले साहेब,महासंघाचे सरचिटणीस संजय महाळनकर,कार्याध्यक्ष प्रशांत जामोदे, मा.अध्यक्ष नंदकुमार ठाकूर, म.राज्यध्यक्ष कविता बोंदर,राज्य उपाध्यक्ष सोनीताई केदारे,जालना महासंघाचे अध्यक्ष डी बी काळे,धाराशिव चे तांबोळी साहेब,देविदास चव्हाण संभाजी नगर चे गणेश धनवाई व राज्य पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सकाळी ठीक 9.30 वाजता विवेकानंद स्टेडियम येथून रॅलीने सांस्कृतिक केंद्र सॉल्ट लेक सिटी कलकत्ता येथे समाप्त होऊन केंद्रीय अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करून हुतात्मा स्मारकास मानवंदना दिली.कोलकत्ता शहर हे प्राचीन जगभरात 19 व्या शतकातील प्रबोधन क्षेत्र म्हणून ओळखले जाते.बहुआयामी स्वतंत्र चळवळीचे एक दोलायमान केंद्र आणि डाव्या लोकशाही चळवळीचे अग्रस्थान असलेले कोलकाता शहर ला मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते.आपल्या देशाचे धर्म निरपेक्ष लोकशाही राज्यव्यवस्था आता एका उंबरठ्यावर उभी आहे जेथे जाणिवेचे अभावामुळे संपूर्ण समाजाचा नाश होऊ शकतो.सरकारी कर्मचारी महासंघ हे समाजाच्या जागरूक मत निर्मिती चा भाग आहे त्यामुळे आपले राष्ट्र आपली राज्य घटना वाचवण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका आहे.AISGEF हे एक संपूर्ण भारतातील व्यासपीठ आहे.जे आपल्या अथक आंदोलने,प्रचार आणि हालचाली द्वारे आपल्या लोकामध्ये मानवतावादी समाज समर्थक चेतना निर्माण करणारे परिचय देतात.सहा दशकाहून अधिक काळ आपल्या फेडरेशन चे हे वैशिष्ट्य आहे.कोणत्याही प्रकारच्या अत्याचारा विरुद्ध उभे राहण्यात तुम्ही कधीही अपयशी ठरला नाहीत पण आज आपण जे पाहतो ते स्वतंत्र्यानंतरच्या जुलमी राजवटीचे सर्वात मारक स्वरूप आहे त्यामुळे या मानवी राक्षसांना पराभूत करण्यासाठी संघटनात्मक धारेदार शस्त्रास्त्रे होणे आव्यशक आहे आणि ते इतिहास जे शिकवतो ते कष्ट करी लोकांच्या इतर वर्गा सोबत खडतर ऐक्य निर्माण करून केले जाऊ शकते व या परिषदेने तो मार्ग काढावा आणि आपल्या मातृभूमीला उध्वस्त होण्यापासून वाचविण्याच्या धेयासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असा संदेश राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.चिलबुले साहेबांनी दिला आहे.कोलकाता येथील या अधिवेशनात महाराष्ट्रातून बहुसंख्य महासंघाचे राज्य पदाधिकारी,जिल्हा
ध्यक्ष हजर होते असे बीड जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक चव्हाण, सचिव नंदकिशोर परळकर, कार्याध्यक्ष शिवलाल राठोड,कोषाध्यक्ष उमेश हुलजुते,सह सचिव प्रदीप बनकर, म.आरोग्य अध्यक्ष आशा ताई धुतमल,संघटक विलास बहिरवाळ, संघटक जाधव साहेब, अध्यक्ष रेखा कवडे,सल्लागार भागवत वाघ,वाहन चालक अनिल गोरे, चतुर्थ श्रेणी अर्जुन शेळके, आरोग्याचे भरत नागरगोजे,प्रसिध्दी प्रमुख मकर ध्वज सावंत,वडवणी तालुका अध्यक्ष बाळासाहेब वारे,वडवणी उपाध्यक्ष राहुल राठोड,गेवराई अध्यक्ष सोमनाथ भोपळे,बीड अध्यक्ष अरविंद दुबाले,उपाध्यक्ष संतोष बनसोडे,पाटोदा तालुका अध्यक्ष मधुकर निंबाळकर,आष्टी तालुका अध्यक्ष सुहास भोसले इत्यादींनी महासंघाच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Comments
Post a Comment