कंत्राटी सफाई कामगारांना कामावर घेण्याच्या मागणी साठी अन्नत्याग उपोषण . बेरोजगार कामगारांचे साखळी उपोषण

 .

बीड२७( प्रतिनिधी ) मागील सहा महिन्यापासुन बीड जिल्ह्यातील कंत्राटी सफाई कामगारांना कामावरुन काढुन टाकले , त्यांना पुर्ववत कामावर घेण्यासाठी व कामगार नेत्यांसह महिला कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करून कारागृहात डांबले अशा अमानवीय कृत्याच्या विरोधात व इतर मागण्यासाठी बीड जिल्हाध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड अन्नत्याग उपोषणास मा . जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे २७ डिसेंबर २०२३ रोजी न्याय मिळेपर्यंत बसणार असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमाद्वारे देण्यात आली आहे . केंद्रिय अध्यक्ष भाई चैनदास भालाधरे यांच्या मार्गदर्शन व केंद्रिय महासचिव भाई गौतम आगळे सर यांच्या झुंजार नेतृत्वात बेरोजगार सफाई कामगार एकजुट दाखवत आपल्या न्याय हक्क प्राप्त करुन घेण्यासाठी साखळी उपोषणास बसणार असल्याची माहिती रोजदांरी मजदुर सेनेच्या वतीने देण्यात आली आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी