मराठा सेवा संघाचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन बडोदा येथे संपन्न

        
  बडोदा येथे नुकतेच मराठा सेवा संघाचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले.
     बडोदा म्हणजेच महाराज सयाजीराजे गायकवाड राजेंचे मराठा संस्थान होते, एकेकाळी जगामध्ये सहा नंबरला श्रीमंतांच्या यादीमध्ये त्यांचे नाव होते . मराठ्यांमध्ये गर्व वाटावा असे सर्वश्रेष्ठ श्रीमंत व्यक्ती म्हणजेच सयाजीराजे गायकवाड होते. 
      आजही त्यांचा राजवाडा बडोदा येथे सातशे ऐक्कर इतक्या अवाढव्य परीसरात दिमाखात सुस्थितीत उभा आहे. ही वास्तू म्हणजे वयक्तीक मालकीची सातसे ऐक्करात विस्तारलेली एकमेव वास्तू आहे, जगाच्या पाठीवर इतकी भव्यदिव्य विस्तिर्ण वयक्तीक मालकीची दुसरी कोणतीही वास्तू नाही.
          त्यांनी अनेक समाज उपयोगी गोष्टी केल्या आहेत.संस्थानामध्ये जागतीक पातळीवरची ग्रंथालयये सुरू केली आणि त्यासाठी पुस्तके भेटही दिली.
   तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षणासाठी बऱ्याच वेळा मदत केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पदव्या घेतल्या,उच्च शिक्षण घेतलं ,त्याचं सारं श्रेय त्यांच्या बुद्धी इतकेच सयाजीराव गायकवाड राजेंकडून मिळालेली आर्थिक मदतीला सुद्धा जाते. आपल्या राज्यात त्यांनी शिक्षणासाठी फार मोलाचे काम केले आहे.
            राजेंनी आपली बरीच मालमत्ता, आपल्या नोकर -चाकर आणि कारभारी लोकांना दानही दिलेली आहे. 
       खरोखरच आपल्याला अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे.अशा ऐतिहासिक भुमीमध्ये अधिवेशन घेऊन मराठा सेवा संघानेही इतिहास घडवला आहे.
            मराठा सेवा संघाच्या दुसर्या अधिवेशनासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार सौ. रेखाताई पुरुषोत्तम खेडेकर ,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कामाजी पवार, सर्वोत्कृष्ट कार्याध्यक्ष म्हणून सलग दोन वर्ष ज्यांना सन्मान मिळला आहे, ते डॉ. संजय पाटील, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय सेक्रेटरी मा. प्रदीप पाटील,जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष सौ निर्मलाताई पाटील,अर्थ कक्षाचे अध्यक्ष सोपानराव शिरसागर आणि सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि देशभरातील सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.
      बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांचे वंशज श्रीमंत समरजीतसिंहजी गायकवाड, सुरतच्या आमदार-सौ.संगीता पाटील, विजय पाटील-माजी केंद्रीय मंत्री, नरेंद्र पाटील-सुरतचे उपमहापौर , भाऊसाहेब पवार-अध्यक्ष राष्ट्रीय अधिवेशन नियोजन समिती आणि अशोक पवार- प्रदेशाध्यक्ष गुजरात,असे दिग्गज लोक कार्यक्रमाला उपस्थित होती.   
       गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष 
शिवश्री रामचंद्र पाटील यांचा मराठा सेवा संघाचे वार्षिक कॅलेंडर आणि मराठा सेवा संघाचे माहिती पुस्तिका देऊन सन्मानित करण्यात आले.
अधिवेशन मोठ्या दिमाखात पार पडले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी