जिवाची वाडी ते लमांन तांडा,केज डांबरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
केज प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम कार्यालया केज आंतर्गत जीवाची वाडी ते लमान तांडा (येवता)या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम चालू असून सदरील रस्त्याचे बीबीएम न करता अंदाजपत्रक (इस्टीमेट) प्रमाणे डांबरी स्त्याचे कामझाले नाही.रस्त्याची जाडी कमी प्रमाणात असून कमी व दर्जाहिन डांबर वापरल्याने सदरील रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. याबाबत ग्रामस्तांनी संबंधित काम करणारे मजूर व गुत्तेदार यांना वेळोवेळी सांगूनही रस्ता अत्यंत खराब प्रतीचा केला आहे. या कामाचे गुण नियंत्रण विभाग,बीड यांच्या मार्फत चौकशीची मागणी गावकऱ्यांन कडून होत असून,अशा प्रकारचे निवेदन उप अभियंता,सार्वजनीक बांधकाम विभाग कार्यालय,केज यांना लेखी निवेदनाची तक्रार दि.२८ रोजी दिली असून निवेदनावर भाजपा नेते,तुळशीराम तोंडे, चेअरमन बालाप्रसाद भुतडा,मुख्याधापक रमेश चौरे,राजाभाऊ तांदळे,प्रभु सारुक,बाबासाहेब चौरे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या असुन
प्रतिलिपी:मुख्यअभियंता,सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालय,छत्रपती संभाजी नगर.
अधिक्षक अभियंता,मंडळ कार्यालय,धाराशीव.
तहसीलदार तथा दंडाधिकारी,तहसील कार्यालय,केज.
यांना पाठविल्याचे तोंडे यांनी प्रतिनीधीशी सांगीतले.
आमच्या प्रतिनिधीने,युवराज मळेकर,उपअभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग,केज यांच्याशी भ्रम्हध्वनी वरून संपर्क केला असता ते म्हणाले शट होण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे हाताने पण उखडतो, त्यांना डांबरी रस्ता चांगला करण्यास सांगतो.
Comments
Post a Comment