नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावी( अजित पवार गट ) इगतपुरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांची मागणी

ईगतपुरी तालुका प्रतिनिधी (-नवनाथ गायकर यांजकडुन) --पुढील वर्षी लोकसभा व विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्या असुन यासाठी प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. तसेच युवकांनी गावनिहाय कमीटी तयार कराव्यात, विद्यार्थी संघटनेच्या पदधिकारी यांनी गावागावात जाऊन पक्ष वाढवावा असे आवाहन माजी आमदार शिवराम झोले यांनी केले.
    खंबाळे- इगतपुरी येथे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. 
   या बैठकीत माजी आमदार शिवराम झोले बोलत होते. जिल्हाध्यक्ष विष्णु म्हैसधुने यांनी या आढावा बैठकीत बोलतांना सांगितले की ज्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले आहे त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी जोमाने कामाला लागावे.
         पुढील खासदार व आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी निवडुण आले पाहिजे यासाठी प्रत्येकाने मतभेद बाजुला ठेवुन प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे, तसेच नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी व मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष विष्णु म्हैसधुने यांनाच खासदारकीची उमेदवारी द्यावी अशी मागणी प्रदेश सचिव गोरख बोडके यांनी या बैठकीत केली. 
   या बैठकीत प्रदेश सचिव गोरख बोडके, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ,तालुका अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे,बाळासाहेब गाढवे, आदींनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीला माजी आमदार शिवराम झोले, प्रदेश सचिव गोरख बोडके, जिल्हाध्यक्ष विष्णु म्हैसधुने, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, रतन जाधव, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, जिल्हा नियोजन समितीचे केरु खतेले, तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे, नामदेव वाघचौरे, अजय खांडबहाले, नारायण वळकंदे, विष्णु राव, मदन कडु, विष्णु चव्हाण, पोपट भागडे, इ.त्र्यं. विधानसभा अध्यक्ष अनिल पढेर, शहराध्यक्ष वसिम सैयद, युवक तालुकाध्यक्ष राहुल सहाणे, हरिष चव्हाण, ज्ञानेश्वर सिरसाट, पांडुरंग खातळे, भाऊसाहेब म्हस्के, अरुण पोरजे, अशोक गभाले, बाळासाहेब झोले, सदाशिव काळ,दूंदा जोशी, ज्ञानेश्वर पासलकर,किरण मुसळे, वसंत भोसले, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, हरीश्चंद्र चव्हाण, रतन बाबळे, निवृत्ती भगत सागर वाजे, अशोक गभाले, विष्णू राव, दिनेश शिंदे, निलेश जगताप उमेश बऱ्हे आदी उपस्थित होते.  
     सुत्र संचालन तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी केले. यावेळी विविध नियुक्तीचे पत्र नवीन पदाधिकारी यांना देण्यात आले.तसेच केरू खतेले यांची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती झाली बद्दल सत्कार करण्यात आला 
फोटो - आढावा बैठकीत नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देतांना सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी