असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या योजनांची माहिती सर्व कामगारापर्यंत गेली पाहिजे-आकांक्षा घाटूळ

गेवराई (प्रतिनिधी) - असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला पुरुषांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती शेतमजूर, ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार अशा सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारापर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी ॲक्शन एड असोसिएशन इंडिया या संस्थेच्या वतीने काठवडा तालुका गेवराई जिल्हा बीड येथे दि. 28 डिसेंबर 2023 रोजी  " असंघटित कामगारांचे अधिकार " या विषयावर गाव पातळीवरील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
       या कार्यक्रमासाठी काठवडा येथील सरपंच जालिंदर कोरे, ग्रामसेविक, सामाजिक कार्यकर्ते कडूदास कांबळे, क्रांती असंघटित महिला कामगार युनियनच्या अध्यक्षा शाहीन पठाण, मंगलताई पवार, कविता डोंगरे, रोहिणी राऊत, शकुंतला घुंगासे, आकांक्षा घाटूळ, तुकाराम खरात, प्रामुख्याने उपस्थित होते.
       असंघटित क्षेत्रातील कामगार साठी असलेल्या योजनांची माहिती सर्व कामगारापर्यंत गेली पाहिजे असे मत यावेळी काठवडा येथील  आकांक्षा घाटूळ यांनी प्रास्ताविक करताना मत मांडले. यावेळी असंघटित क्षेत्रातील असणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती सामाजिक कार्यकर्ते कडुदास कांबळे यांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मुख्य उद्देश गावाचा विकास आणि ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे.  या योजनेच्या माध्यमातून आपण गावातच काम उपलब्ध करून गावातील होणारे स्थलांतर रोखू शकतो असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. रोजगार हमी योजनेचे काम मागणी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया यावेळी त्यांनी समजावून  सांगितली. तसेच ई - श्रम कार्ड, इमारत आणि इतर बांधकाम कामगार कार्ड ( बी. ओ. सी. डब्ल्यू ) आणि त्यासंबंधीच्या योजना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
        उपस्थित काठवडा गावचे सरपंच गोरगरीब असंघटित क्षेत्रातील मजुरांना शासनाच्या कल्याणकारी योजना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा विश्वास यावेळी दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता डोंगरे यांनी केले तर आभार मंगल ताई पवार यांनी मानले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी