३१ डिसेंबर पासून दर रविवारी भरणार देऊळगाव घाटला शेळ्यांचा बाजार.
आष्टी (प्रतिनिधी--गोरख मोरे ) :
रविवार दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी मौजे देऊळगाव घाट ,तालुका आष्टी, जिल्हा बीड ,येथे दर रविवारी शेळ्यांचा बाजार भरण्यास सुरुवात होणार आहे .
या बाजाराचा, देऊळगाव घाट परिसरातील सर्व गावांना, या बाजार पेठेचा फायदा होणार आहे . मौजे देऊळगाव घाट परिसरातील शेतकऱ्यांना ,शेळ्या विक्रीसाठी,पाथर्डी ,चिचोंडी ,कडा, बाजार सोडले तर आसपास कुठेही शेळ्यांचा बाजार भरत नसल्यामुळे, तो बाजार देऊळगाव घाट येथे भरण्यास सुरुवात झाल्यामुळे, देऊळगाव घाटला एक प्रकारे महत्त्व प्राप्त होणार आहे .त्यामुळे शेळी विक्रेत्या मधे एक प्रकारे नवचैतन्य निर्माण झाले आहे .
मौजे देऊळगाव घाटला दर आठवड्याच्या रविवारी, भाजीपाल्याचा बाजार भरत असल्यामुळे, त्यातच शेळ्यांचा बाजार सुरू झाल्यामुळे देऊळगाव घाट च्या बाजारपेठेला आणखीनच महत्त्व प्राप्त होणार आहे .
या बाजाराचे उद्घाटन मौजे देऊळगाव घाट चे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब ठोंबरे मेजर, सरपंच रामकिसन ठोंबरे, माजी सरपंच गोवर्धन ठोंबरे ,पत्रकार आदिनाथ ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी परिसरातील शेतकरी, नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रामपंचायत मौजे देऊळगाव घाट यांनी केले आहे .
Comments
Post a Comment