मंचर विभागात संयुक्त कृती समितीच्या वतीने आंदोलन

मंचर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री अनिल कुमार डोंगरे यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरुद्ध संयुक्त कृती समिती त्यामध्ये सब ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, तांत्रिक कामगार युनियन 50 59, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन 1029, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना ,महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ इत्यादी संघटनांच्या वतीने मंचर विभागिय कार्यलया समोर दिं 28.12.2023 रोजी  भव्य द्वारसभा घेऊन आंदोलन करण्यात आले
मंचर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता हे शाखा अभियंता तांत्रिक कर्मचारी लेखा वाचताना कर्मचारी यांना मानसिक त्रास देत आहेत तसेच खाजगी एजंट  कंपनीच्या कामात सहभाग करून कर्मचारी व अधिकारी तसेच वीज ग्राहक यांना त्रास देत आहेत अनेक ग्राहकांनी विभागीय कार्यालयात लेखी तक्रारी दिलेल्या आहेत त्यामुळे कंपनीची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे त्याचा परिणाम कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी मंचर उपविभाग यांनी त्यांचे सोबत काम करण्याची मानसिकता नसल्याचे सह्यांचे निवेदन माननीय कार्यकारी अभियंता श्री बांगर साहेब यांना दिले व कारवाही करून बदली करण्याची मागणी करण्यात आली. वेळोवेळी लेखी व तोंडी कळवूनही महावितरण प्रशासन त्यांचे वर कारवाही करीत नसल्याने सर्व कामगार व अधिकारी यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागला असे संघटना पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले ....जर 3 दिवसांत बदली न झाल्यास पुढे तीव्र स्वरूपाचे एक दिवशीय साखळी आंदोलन दि 02.01.2024 पासुन सुरू होऊन ते दिं 03.01.2024 पासुन मंचर उपविभाग कामबंद आंदोलन सुरू होईल .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी