भिमा कोरेगांव शौर्य दिन उत्सवपुर्ण वातावरणात शांततेत साजरा करा -नगरसेवक अँड विकास जोगदंड
बीड (प्रतिनिधी) 30 डिसेंबर अमर्यादित केलेल्या अन्यायाचा प्रतिकार म्हणजेच भिमा कोरेगाव या ठिकाणी
1 जानेवारी 1818 ला
घडलेला रणसंग्राम इतिहासाच्या पानावर शूर वीर महार सैनिकांनी आपल्या पराक्रमातून कोरला असून त्याची साक्ष भीमा कोरेगाव येथील शौर्यस्तंभ कायम देत राहील
1 जानेवारी 1927 ला तमाम भारतीयांचे उद्धारकर्ते,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या शौर्य स्तंभास भेट देऊन शूर महार सैनिकांचा पराक्रम संबंध जगापुढे आणला तेंव्हा पासून 1 जानेवारीला भिमा कोरेगाव येथील विजयी शौर्य स्तंभास अभिवादन करत शौर्य दिन साजरा करण्यात येतो तो आजतागायत साजरा करण्यात येत आहे
हा उत्सव आपल्या पूर्वजांच्या शौर्याची गाथा आठवून साजरा केला जातो तो कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नसून मानवी मूल्य नाकारणाऱ्या विचारधारेच्या विचारांना तिलांजली देण्याचा आहे
शौर्य दिन उत्सवपुर्ण वातावरणात संबंध बहुजन समाजाला सोबत घेऊन शांततेत साजरा करावा
बेरोजगारी,भ्रष्टाचार,या आधुनिक शत्रूंशी लढण्याचा निर्धार करून बेरोजगारी,भ्रष्टाचार कायमचा हद्दपार करण्याचा संकल्प करावा
असे आव्हान भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष, तथा नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे
Comments
Post a Comment