तिसऱ्या दिवशीही कंत्राटी कामगारांचे आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरूच


मुंबई ( प्रतिनिधी ) राज्यातील वीज कंत्राटी कामगार व सफाई कामगारांसह इतर आस्थापनेतील कंत्राटी कामगारांना जोपर्यंत नियमित करत नाहीत तोपर्यंत समान काम समान वेतन मिळावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी रोजंदारी कंत्राटी कर्मचाऱ्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. २७ डिसेंबर २०२३ पासून आझाद मैदान मुंबई येथे साखळी उपोषण / धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा तिसरा दिवस सुरू झाला तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची कसलीही दखल शासनाने घेतली नाही. जोपर्यंत काही निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा संतप्त कामगार यांनी घेतला आहे.‌ राज्यातील वीज कंत्राटी कामगार व सफाई कामगार यांची अतिअवश्यक सेवेत गनना होते. त्यांना जोपर्यंत नियमित करत नाहीत तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे समान काम समान वेतन देण्यात यावे, बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद / नगरपंचायत आस्थापनानेत त्यांच्या अधिनस्त कंत्राटदार व मुख्याधिकारी यांच्यात करारनामा करून कार्यारंभ आदेश दिला जातो परंतु त्याची अंमलबजावणी न करता कंत्राटी कामगारांचे मागील २० ते २२ वर्षापासून शोषण करून त्यांना त्यांच्या मुलभूत हक्क व अधिकारा पासून वंचित ठेवले आहे, त्यांना तात्काळ न्याय द्यावा, परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन, विशेष भत्ते, दिवाळी बोनस याचा लाभ मिळत नाही, संबंधित अधिकारी व कंत्राटदार मिळून वीज कंत्राटी कामगारांची मागील २५ ते ३० वर्षांपासून बेकायदेशीरपणे पिळवणूक करून मुलभूत अधिकारा पासून वंचित ठेवले आहे, त्यांना तात्काळ न्याय द्यावा, कंत्राटी सफाई कामगारांचे किमान वेतन दिनांक २४ फेब्रुवारी २०१५ रोजी पुनरनिर्धारीत केले होते, दर पाच वर्षांनी शासन निर्णय निर्गमित केले जाते, परंतु आठ वर्षे होऊन सुध्दा अद्याप महागाई निर्देशांकानुसार वाढ केली नाही ती तात्काळ करावी, मुख्याधिकारी नगरपरिषद बीड व पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन बीड यांनी चोराच्या उलट्या बोंबा याप्रमाणे आंदोलन करणार्या कंत्राटी सफाई महिला 
 कामगार आणि कामगार नेत्यांवर 353 व इतर खोटे गुन्हे दाखल केले ते तात्काळ रद्द करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची त्रस्त उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर उचित कायदेशीर कारवाई करावी, आझाद मैदान मुंबई येथे होत असलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी राजेश कुमार जोगदंड यांच्यासह अन्यायग्रस्त कामगार जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अन्नत्याग उपोषण करत आहेत, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करून संबंधित अधिकारी यांना तसे लेखी निर्देश/ आदेश देत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहणार आहे, अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी दिली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी