मिशनी आपुलकी अंतर्गत भोगलवाडी शाळेस एक लाख रुपये लोकसहभाग

  शाळेच्या पाणी सुविधेसाठी ग्रामपंचायत / श्री. बापूसाहेब कार्ले सरसावले

आष्टी  ( प़तिनिधी --गोरख मोरे  ) :  
  जामखेड तालुक्यातील  जि.प.प्रा.शाळा भोगलवाडी या शाळेच्या पाणी सुविधेसाठी  मिशन आपुलकी अंतर्गत १५  वा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत व श्री बापूसाहेब कार्ले यांनी तब्बल एक लाख रुपये वस्तूरुपाने लोकसहभाग देऊन दातृत्वाचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे .
   भोगलवाडी शाळेस कुसडगाव ग्रामपंचायतकडून २०० फूट बोअर वेल घेण्यात आला ,परंतु पाणी कमतरते अभावी बोअर वेल खोली वाढविणे गरजेचे होते . शाळेतील शिक्षकांनी ही बाब ग्रामस्थांच्या  लक्षात आणून दिली. कुसडगाव भूमीपुञ युवा उद्योजक तथा कार्यकुशल राजकारणी बापूसाहेब कार्ले उपसरपंच संतोष भोगल व ग्रामपंचायत सदस्य कल्याण वटाणे यांनी  शाळेच्या मदतीसाठी हात पुढे करत स्वखर्चातून २०० फूट बोअर वेल घेऊन दिला , व मुबलक पाणीही लागले .
दानशूर व्यक्तिमत्त्व  बापूसाहेब कार्ले यांनीही आपले दातृत्व दाखवत  स्वखर्चाने मोटार व इतर साहित्य देण्याचे जाहीर केले . जि.प.अहमदनगर कडून सुरु असलेल्या मिशन आपुलकी अंतर्गत तब्बल एक लाख रुपये वस्तूरुपाने दिले .शाळेची पाणी समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायत व  श्री बापूसाहेब कार्ले यांनी केलेल्या या कार्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे .
  जामखेड तालुक्याचे कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब,विस्तारअधिकारी सुरेश मोहिते साहेब,केंद्रप्रमुख नवनाथ बडे साहेब यांनी या दानशूर ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे .
    शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोहन नेमाडे  व  श्री. संदिप गायकवाड यांनी विद्यार्थी व शाळा हितासाठी प्रयत्नशील राहून शाळा विकासासाठी ग्रामस्थांचा उत्तम समन्वय ठेवला आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी