ठाकुर साहेब कायदा फक्त गोरगरीबांनाच लागु होतो का??गोरगरीब रिक्षाचालक,फळ,भाजी विक्रेत्यांना तंबी आणि अनाधिकृत होर्डिंग्ज धारकांना पायघड्या
ठाकुर साहेब कायदा फक्त गोरगरीबांनाच लागु होतो का??गोरगरीब रिक्षाचालक,फळ,भाजी विक्रेत्यांना तंबी आणि अनाधिकृत होर्डिंग्ज धारकांना पायघड्या :- डॉ.गणेश ढवळे
बीड:- बीड शहरातील रस्त्यांवरील हातगाडे,भाजी किंवा फळ विक्रेते यांच्यामुळे व बेशिस्त पार्किंग केलेल्या रिक्षामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असुन या दोन्ही घटकांनी शहरात वाहतूक शिस्त पाळावी अशा सुचना पोलिस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर यांनी मुख्याधिकारी नगरपरीषद बीड नीता अंधारे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सर्वांनी रोडवर वाहतुकीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी तंबीच दिली आहे मात्र याचवेळी बीड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत होर्डिंग्ज व फ्लेक्स मुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत तसेच दुभाजकावर मोठमोठाले होर्डिंग्ज लावल्यामुळे अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे.त्यामुळे वाहतुकीस अडथळा करणा-या गोरगरीब हातगाडे,फळे,भाजी विक्रेते,रिक्षाचालक यांना कायद्याचा धाक दाखवणारे पोलिस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर अनाधिकृत होर्डिंग्ज प्रकरणात राजकीय नेत्यांवर कायदेशीर कारवाई करणार का?? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विचारला आहे.
अनाधिकृत होर्डिंग्ज प्रकरणी मुख्याधिकारी नगरपरीषद बीड यांनी किती कारवा-या केल्या??
---
बीड शहरांचे विद्रुपीकरण करणारे बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, विश्रामगृह आणि बीड शहरातील धुळे ते सोलापूर आणि बीड ते नगर रोडवरील दुभाजकावर, विद्युत पोलला मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत होर्डिंग्ज लावलेले आहेत.याप्रकरणी वारंवार निवेदने तसेच आंदोलनाद्वारे मुख्याधिकारी नगरपरीषद बीड नीता अंधारे यांना निवेदन देऊन सुद्धा अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नाही मात्र गोरगरीबांच्या पोटावर पाय देण्याचे काम मात्र मुख्याधिकारी पुढाकार घेऊन करताना दिसत असुन याविषयी बीडकरांमध्ये तिव्र नाराजी दिसून येत आहे.
Comments
Post a Comment