भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादनास लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे - ऋषिकेश वाघमारे
बीड प्रतिनिधी- भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शौर्य स्तंभास अभिनंदन कार्यक्रम व मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते ऋषिकेश वाघमारे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. भीमा कोरेगाव चा ऐतिहासिक लढा संपूर्ण जगाला माहित व्हावा. आमचे पूर्वज किती शूरवीर होते. त्यांच्या शौर्याची दखल घेत. इंग्रज शासकांनी भीमा नदीच्या काठावर शौर्यस्तंभ उभारला आहे. 1 जानेवारी 1818 या दिवशी ही लढाई लढली गेली होती. त्या लढाईत पेशव्यांचा पराभव करून महार योध्यांनी ही लढाई जिंकली वीरमरण पत्करले त्या शूरवीर पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक वर्षी कोरेगाव भीमा येथे येत असत .सध्या वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर हे प्रत्येक वर्षी जातात याही वर्षी अभिवादनसाठी महाराष्ट्रातून देशातून लाखोच्या संख्येने आंबेडकर प्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते ऋषिकेश वाघमारे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment