व्यसनमुक्ती जनजागृती रॅली,व्यसनमुक्ती घोषणांनी दणानुन गेले बीड शहर
घोषणा फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांचा सहभाग
डॉ.ज्योती मेटे,जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दाखवला रॅलीला हिरवा झेंडा
"हम लढेंगे भी और जितेंगे भी" ज्योती मेटे यांचा सूचक इशारा
बीड (प्रतिनिधी) वर्षाच्या शेवटच्या दिवशी तरुण नवर्षाच्या स्वागतासाठी व्यसन करतात. यामुळे भविष्यात या तरुणांचे कुटूंब उध्वस्त होऊन समाज व्यसनाधिन होतो. म्हणून दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे नववर्षाच्या आदल्या दिवशी दरवर्षी व्यसनमुक्तीसाठी जनजागृती फेरी काढून भव्य संगीत रजनी घेऊन गोड दुध पाजत असत. हीच चळवळ आत डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी हाती घेतली आहे.
शनिवारी (दि. ३०) या निमित्त भव्य व्यसनमुक्ती जनजागृती फेरी काढून त्याचा समारोप संत महंत यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी.डॉ. ज्योती मेटे, ओम प्रकाश शेटे, शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे, भारत श्री स्नेहा कोकाने पाटील, नारायण गडाचे मठाधिपती हभप शिवाजी महाराज , हभप लक्ष्मण महाराज मेंगडे, हभप नवनाथ महाराज , मौलाना मुक्ती अब्दुल सहाब मौलाना जफर काजी, ख्रिश्चन महासंघाचे आशिष शिंदे,रमेश पोकळे,शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशिद, नितीन कोटेचा एमआयएम चे जिल्हा अध्यक्ष शेख शफिक भाऊ, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, स्वप्निल गलधर, शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा)परमेश्वर सातपुते, अशुतोष मेटे, आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
मद्यपान संसाराची धुळधाण, व्यसनाची गोडी अन् संसाराची राखरांगोळी, घ्याल तंबाखुची साथ, आयुष्य होईल बरबाद, अशा विविध घोषणांनी बीड शहर दणानुन गेले छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून निघालेल्या रॅलीचा समरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आला. या रॅलीला डॉ. ज्योती विनायकराव मेटे,जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बडे यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि सुरुवात करण्यात आली.
मराठा आरक्षण आणि शिवस्मारक या दोन गोष्टीशी तडजोड नाही - डॉ. ज्योती मेटे
राष्ट्राचे आधारस्तंभ म्हणजे ही भावी पिढी आहे आणि याच पिढीकरिता आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे हा कार्यक्रम आयोजित करत असताना तुकाराम रुरल अँड ह्युमन डेव्हलपमेंट चॅरिटेबल ट्रस्ट बरोबरच शिवसंग्रामने प्रयत्न केले शिवसंग्राम ही सामाजिक संघटना आहे सामाजिक वसा आणि वारसा स्वर्गीय मेटे साहेब यांच्या निधनानं थांबवणं हे समाज हिताचे नाही.
लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांचा स्मरण करत असताना एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल मराठा आरक्षण आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या दोन गोष्टींमध्ये आमची कधीही तडजोड होणार नाही आणि यासाठी शिवसंग्राम चा प्रत्येक मावळा ताकदींनीशी लढणार आहे आणि या मावळ्यांना मी एकच सांगू इच्छिते की "हम लढेंगे भी और जितेंगे भी" असा सूचक इशारा देखील ज्योती मेटे यांनी दिला.
स्वर्गीय विनायकराव मेटे माझ्यासाठी आयडॉल; देवेंद्र फडणवीस आपल्या बहिंनीसाठी ओवाळनी दिल्या शिवाय राहणार नाहीत - ओमप्रकाश शेटे
संत महंत सर्व जाती धर्मातील प्रमुख उपस्थित असलेले व्यासपीठ महाराष्ट्रात दुसरीकडे पाहायला मिळणार नाही आणि हे व्यसनमुक्तीचे व्यासपीठ विनायकराव मेटे साहेबांनी तयार केले आहे. राज्याच्या पटलावर काम करणारे जिल्ह्यातील स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि विनायकराव मेटे हे दोनच नेते होते. अनेक कार्यक्रम होतात मात्र व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेणारे एकमेव मेटे साहेब होते आणि तो वसा ज्योतीताई समर्थ पने चालवत आहेत याचा सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमासाठी मी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्या वरून त्यांचा प्रतिनिधी महणून आलो आहे आणि देवेंद्र फडणवीस आपल्या बहिंसाठी ओवाळनी दिल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास देखील ओम प्रकाश शेटे यांनी व्यक्त केला.
बीड विधानसभा शिवसंग्राम लढणार - तानाजीराव शिंदे
आम्ही युतीतील घटक पक्ष आहोत आम्हाला उमेदवारी मागण्यासाठी कुणा कडे जाण्याची आवश्यकता नाही आम्ही बीड विधानसभेसाठी आमची उमेदवारी जाहीर करतो बीड विधानसभा शिवसंग्राम लढणार अशी घोषणा शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी केली.
Comments
Post a Comment