हरयाणातील रोड मराठा " १४ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार शौर्य दिन
हरयाणातील रोड मराठा " १४ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार शौर्य दिन
पानिपत युद्धानंतर दिल्ली तख्तावर मराठ्यांचे वर्चस्व होते
अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत ( बस्ताडा गाव ) हरयाणा आयोजित " पानिपत मराठा शौर्यदिन " साजरा करण्यात येतो. आणि या कार्यक्रमात गोमंतकातील शिवप्रेमींची उपस्थिती २०१८
पासून मराठा राजाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली असते. बुधवार दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी खास हरयाणातील रोड मराठ्यांच्याचे वंशज मराठा सुरजीत चौधरी, मराठा करमविर महाले , मराठा दलबीरसिंघ चौधरी, मराठा
परविरसिंघ चौधरी आणि इसमसिंघ तुराण सांकवाळ ( दक्षिण गोवा ) येथे राजाराम पाटील यांच्या निवासस्थानी आले होते. त्यांचे स्वागत श्री राजाराम पाटील (अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत गोवा प्रमुख ), श्री विष्णू निकम ( मराठा मित्र मंडळ, गोवा) श्री भरत पाटील ( मराठा सेवा संघ गोवा)) श्री देवराज राणे आणि श्री अमोल कोळी ( छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य सेवा मंडळ, सांकवाळ गोवा ) स्वागत केले. हिंदूस्थानावर अनेक परकीयानी आक्रमणे केली, आणि ती थोपवून धरण्याचे काम महाराष्ट्रील मराठ्यानी केले. पानिपतच्या रणभूमीवर " दीड लाख बांगड्या फुटल्या " याचा अर्थ समकालीन तिन लाख सैन्यापैकी मराठा दीड लाख सैन्याने हिंदूस्थानासाठी आपले बलिदान दिले. १४ जानेवारी १७६१ या एकाच दिवशी पानिपतच्या परिसरातील बस्ताडा गावाजवळ जवळ जवळ पन्नास हजार सैन्य कापले गेले. आणि म्हणूनच हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे वंशज " शौर्यदिन " साजरा करतात.
या कार्यक्रमात देशातील सर्वच प्रांतातील शिवप्रेमीं आवर्जून उपस्थित राहतात. सदर कार्यक्रमाच्या निमंत्रणाच्या निमित्ताने " पानिपत युद्धानंतर दिल्ली तख्तावर मराठ्यांचे वर्चस्व होते " असे प्रतिपादन सन्माननीय मराठा श्री सुरजीत चौधरी यांनी सांगितले. मराठा हरले असते तर अब्दाली परत निघून गेला नसता असेही पुढे म्हणाले. हरयाणा राज्यात रोड म्हणून ओळखले जाणारे मराठे हे महाराष्ट्रातील मराठेच आहेत याचे संशोधन कोल्हापूराचे इतिहास संशोधक मा श्री वसंतराव मोरे यांनी सिद्ध केले असेही त्यांनी सांगितले.
हरयाणा राज्यात आम्ही अल्प संख्याक असूनही सर्व क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे असं अभिमानाने सांगितले. दक्षिण गोव्यातील संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळयाचे दर्शनही घेतले.
Comments
Post a Comment