विद्यार्थ्यांचे बळी गेल्यावरच गतिरोधक बसवणार का? लिंबागणेशकर करणार चक्का जाम :- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश:- अतिवेग,वाहतुक नियमांचे उल्लंघन यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असुन अपघातात जीव गमावणारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.वेगाला आवर घालण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक ( स्पीड ब्रेकर) बसवले जातात.राष्ट्रीय महामार्गावर एनएचआय तर राज्य मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन गतिरोधके बसवली जातात .मात्र अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी मार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान लिंबागणेश येथील इयत्ता ४ ते १२ वी पर्यंत पंचक्रोशीतील १००० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून भालचंद्र माध्यमिक विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वार समोरील राज्य मार्गावर गतिरोधके बसविण्यात आली नसल्याचे शाळेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.संबधित प्रकरणी वारंवार निवेदने तसेच आंदोलनानंतर सुद्धा कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांचे बळी गेल्यावरच गतिरोधक बसवणार का?? असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.४ रोजी लिंबागणेश बसस्थानक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक बीड यांच्या मार्फत मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ मुंबई,अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांना दिले असुन निवेदनावर युवा ग्रामीण पत्रकार संघ बीड जिल्हाध्यक्ष हरिओम क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते विक्रांत वाणी, संतोष वाणी,कृष्णा वायभट यांच्या स्वाक्ष-या आहेत.
मधुकर -श्रीहरी -घुले-कन्स्ट्रक्शन कंत्राटदारांचा मुजोरपणा वाढला
--
भालचंद्र माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि पालक यांनी विद्यार्थ्यांच्या जिवितासाठी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या ठीकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत यासाठी दि.२४ आगस्ट २०२३ रोजी भालचंद्र माध्यमिक विद्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले होते.तेव्हा आंदोलनस्थळी अभियंता महेश देशमुख,नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर,मंडळ अधिकारी वंजारे, तलाठी पोतदार,नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनी विलास हजारे यांच्या समक्ष आठवडाभरात गतिरोधक बसविण्यात येतील या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.मात्र या घटनेला ५ महिने उलटुनही अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळे मधुकान -श्रीहरी- घुले कन्स्ट्रक्शन कंत्राटदारांचा मुजोरपणा वाढला असुन ग्रामस्थांमध्ये तिव्र संतापाची भावना आहे.
Comments
Post a Comment