शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करा ; कर्जाची वसुली थांबवा - विश्वनाथ शरणांगत


बीड प्रतिनिधी -  महाराष्ट्रात सध्या पाण्याअभावी  दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप रब्बीची दोन्हीही हंगामी उध्वस्त झाली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही ठिकाणी निर्माण झाला आहे.  त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शासनकर्त्यांनी  याची गंभीर दखल घेऊन तात्काळ  शेतकऱ्याची कर्जमाफी व सक्तीची वसुली थांबवावी  अशी मागणी  विश्वनाथ शरणागत यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे कृषिमंत्री तथा  बीडचे पालकमंत्री  यांच्याकडे केली आहे. सरकारने सामान्ये शेतकर्यांची दिशाभुल केली का ? हिवाळी आधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकर्यांचे सरसगट कर्ज माफ करणार आसे पत्रकार परिषदे मध्ये केली होती घोषणा परंतु बँकवाले शेतकऱ्यांच्या दारात येवुन उसुलीचा तगादा शेतकऱ्यांकडे चालु आहे.
जर शासनाने सरसगट  कर्ज माफीची पत्रकार षरिषद मध्ये केलेली घोषणा शेतकर्यांची दिशाभुल करणारी घोषणा आहे का? ... जर  दिशाभुल घोषणा नसेल तर जे बँकवाल्यांनी शेतकर्यांना सक्तीची वसुली चालवली ती ताबडतोब थांबवा. अन्यथा बाँकाना शासनाने पत्र द्यावे की शेतकर्यांच्या दारात कर्ज वसुली साठी जाऊ नये. याबाबतचे पत्र संबंधीत बाँक वाल्यांना शासनाने देणे गरजेचे आहे. आशी मागणी किर्ती वंचित बहूजन  आघाडीचे संस्थापक आध्यक्ष तथा पत्रकार विश्वनाथ शरणांगत यानी एका नियोजनाद्वारे केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी