नेकनुर स्त्री व कुटीर रूग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना सुरू करण्यासाठी डॉ.ओमप्रकाश शेटे यांना निवेदन:- डॉ.गणेश ढवळे



बीड:- केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा याकरीता विकसित भारत संकल्प यात्रा २०२४ अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित योजनांची आढावा बैठकीसाठी बीड येथे आले असता नेकनुर स्त्री व कुटीर रूग्णालयातील महात्मा ज्योतिराव फुले व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना वर्षभरापासून बंद असल्याने बालाघाटावरील ४०-५० गावातील रूग्णांना अडचण येत असुन त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करत बीडला उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे नेकनुर स्त्री व कुटीर रूग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना सुरू करण्यात यावी अशी मागणी डॉ.ओमप्रकाश शेटे , प्रमुख आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती महाराष्ट्र शासन यांना सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

*जिल्हा प्रशासनाला गांभीर्य नाही; शासन आपल्या दारीचा केवळ दिखावा*
-------
  नेकनुर ता.जि.बीड येथील स्त्री रूग्णालय बालाघाटावरील गोरगरीब रूग्णांसाठी आरोग्य सुविधेचे वरदान असुन महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (MJPJAY & PMJAY ) लाभ मिळत होता.परंतु चुकीच्या माहितीच्या आधारे CMO Mumbai डॉ.सुशांत पटवर्धन यांच्या मार्फत संपूर्णपणे शहानिशा न करताच योजनेंतर्गत लाभ बंद करण्यात आलेला आहे त्या संदर्भात दि.१९आक्टोबर २०२२रोजी डॉ.आखिलाक शिंदे, वैद्यकीय अधीक्षक स्त्री रूग्णालय नेकनुर यांनी डॉ.सुशांत पटवर्धन यांना खुलासा केलेला आहे तसेच दि.७ नोव्हेंबर २०२२ रोजी मा.उपसंचालक आरोग्य सेवा लातुर यांना वरील सेवा पुर्ववत सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे.अहमदपुर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील नेकनुर मोठी बाजारपेठ असल्याने बालाघाटावरील ३५-४० गावातील ग्रामस्थांना याचा आधार असुन त्यांची गैरसोय व आर्थिक नुकसान होत असुन या संदर्भात दि.१२.१२.२०२२ रोजी जिल्हा रुग्णालय बीड येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले होते तसेच दि. ३१.०७.२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी धरणे आंदोलन करण्यात आले होते. परंतु अद्याप योजनेअंतर्गत लाभ मिळत नाही त्यामुळे एकंदरीतच जिल्हा प्रशासनाला याचे गांभीर्य नसुन शासन आपल्या दारी उपक्रम केवळ दिखावा असल्याचे दिसून येत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी