संजय गांधी निराधार ,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना अंतर्गत माजी जेष्ठ नगरसेवक विष्णु (भैय्या ) वाघमारे यांनी पाठपुरावा करून लाभार्थ्यांना मिळुन दिले मंजुरी पत्र

.

सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासन,सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग योजना अंतर्गत या विभाकडून सदरची योजना राबवली जात आहे.शासनाच्या आदेशावरून मा.बीड जिल्हाधिकारी याच्या पत्रात सुचित केल्यानुसार सदरील योजनेची बैठक दि.२०/११/२०२३ रोजी संपन्न झाली .संजय गांधी (१५०० रुपये), श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना(१५०० रुपये), राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना (२०,००० रुपये) अर्थसाहाय्य करण्यासाठी लाभाथ्थींना आर्थिक साहाय्य केले जाते.या योजना तहसील कार्यालय यांच्याकडून अर्ज मागावले जातात. या समितीची बैठक दि.२०/११/२०२३ रोजी संपन्न झाली होती .या बैठकीच्या अनुशगाने माजी जेष्ठ नगरसेवक विष्णु (भैय्या) शामराव वाघमारे यांनी प्रभाग क्रः- 2 व बीड शहरातील निराधार व्यक्तींना यायोजनेचे लाभ मिळुन देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच योजने अंतर्गत ज्या लाभार्थींनीचे नाव त्रुटी मध्ये नाव आले असेल तर त्या लाभार्थींनी आपल्यानावापुढे त्रुटीचे शेरा असेल तर त्रुटी पुर्तता करण्यासाठी काही अडचण येत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन माजी नगरसेवक विष्णु (भैय्या) शामराव वाघमारे यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी