शेवगांव शहराच्या नियोजित प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ मोजक्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये साध्या पद्धतीने संपन्न


 शेवगाव तालुका प्रतिनिधी दि. 28 डिसेंबर 2023 वार गुरुवार 
 याबाबत सविस्तर वृत्त असे की आज गुरुवार ता. 28 डिसेंबर रोजी प्रतिनिधिक स्वरूपामध्ये शेवगाव शहराच्या नियोजित पाणीपुरवठा योजनेच्या सुमारे आठ लाख 70 हजार लिटर क्षमतेच्या जल कुंभाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम गणपती मंदिर कोरडे वस्ती येथे पार पडला यावेळी शेवगाव शहर पाणी कृती समितीचे अध्यक्ष प्रेमसुख जाजू डॉ. संजय लड्डा व सराफ व्यावसायिक संजय शेवाळे देवेंद्र देवळाली कर सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख पाणीपुरवठ्याच्या नगरपरिषदेच्या अधिकारी श्रीमती. पूर्वा माळी इंद्रायणी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सुनील कुमार नागरगोजे त्यांचे इंजिनियर प्रमोदकुमार गुजरे नगरपालिकेचे पाणीपुरवठ्याचे मुकादम शरद लांडे या मोजक्या लोकांचच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी 02:30 वाजता संपन्न झाला यावेळी बोलताना इंद्रायणी कन्स्ट्रक्शन चे सर्वेसर्वा श्री. सुनील कुमार नागरगोजे यांनी सांगितले की संबंधित पाणी योजना पूर्ण ताकतीनिशी नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे सर्व सामाजिक कार्यकर्ते शेवगाव चे सर्वसामान्य नागरिक सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि नगरपरिषदेचा स्टाफ यांच्या सूचना आणि सहकार्य निश्चित आमच्या कंपनीला होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नियोजित नवीन चार जल कुंभाचे 1) गणपती मंदिर कोरडे वस्ती 2) लक्ष्मी नगर मिरी रोड 3) खंडोबा माळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एम.जी.पी. ची जागा 4) गेवराई रोड सुळबाचा माथा या सर्व ठिकाणच्या चारही जलकुंभाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून योजना नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला  



 शेवगाव शहर पाणी कृती समिती चे अध्यक्ष प्रेमसुख जाजू यांनी शेवगाव शहरातील सर्व राजकीय सामाजिक संघटनांचे प्रमुख आणि कार्यकर्ते व एस. के. सालीमठ मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे रेंगाळलेली योजना मार्गी लागल्याचे मनोगत व्यक्त केले व आंदोलनाचे हत्यार उपसण्याआधीच योजना सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी