प्राध्यापक सशक्त असतील तरच सशक्त विद्यार्थी घडू शकतात - निलीमा सोनवणे



शासकीय नर्सिंग कॉलेजच्या चर्चासत्राचे प्राचार्या सुवर्णा बेदरे-कुलथे यांचे उत्कृष्ट नियोजन

बीड (प्रतिनिधी) - प्राध्यापक जर शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सशक्त असतील तरच ते सशक्त अध्यापन करू शकतात. आजच्या आधुनिक काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकचे ज्ञान प्राप्त होते. प्राध्यापकांनी या गोष्टीचा विचार करून सर्व गुणसंपन्न राहणे महत्त्वाचे आहे. तरच भावी विद्यार्थ्यांची पिढी सशक्त बनू शकते असे प्रतिपादन सहाय्यक संचालक (सुश्रुषा, मुंबई) डॉ. निलीमा सोनवणे यांनी बीड जिल्हा शासकीय नर्सिंग कॉलेजच्या वतीने आयोजित इम्प्रोविंग नर्सिंग एज्युकेटर्स टू मीट ग्लोबल हेल्थकेअर चेंजेस या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी केले.
शासकीय नर्सिंग कॉलेज, बीड यांच्या वतीने शहरातील हॉटेल नीलकमल येथे प्रथमतःच राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. शासकीय नर्सिंग कॉलेज जिल्हा रुग्णालय बीड मार्फत नर्सिंग एज्युकेटरस् व नर्सिंग विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आलेले हे राष्ट्रीय चर्चासत्र आज दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू झाले होऊन संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत चालले. चर्चा सत्राचे उद्घाटन सहाय्यक संचालक (सुश्रुषा, मुंबई) डॉ. निलीमा सोनवणे यांच्या हस्ते आणि बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. याप्रसंगी आरोग्य उप‌संचालक, आरोग्य परिमंडळ लातूर डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. अविनाश देशमांडे, डॉ. उज्वला वनवे, डॉ. शुभानंद शिंदे, डॉ. शोभा गायकवाड, शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा बेदरे-कुलथे, सुपरिटेंडंट ऑफ नर्सेस श्रीमती रमा गिरी, श्रीमती क्षिरसागर शैलजा, शिला मोहीते, डॉ. चिंचकर बी.डी.,डॉ. कदम अरूण यांच्यासह पत्रकार बांंधवांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा बेदरे-कुलथे यांनी केले. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पाठिंब्यामुळेच राज्यातील नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे पहिले राष्ट्रीय चर्चासत्र बीड येथे संपन्न होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. तसेच राज्यभरातील नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि प्राध्यापकांनी या चर्चासत्रास उपस्थिती दर्शविल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
यावेळी पुढे बोलताना डॉ. नीलिमा सोनवणे म्हणाल्या की, नर्स हा आरोग्य सेवेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून कोरोना व्हायरसच्या संकट समयी सर्वात पुढे राहून रुग्णांना सेवा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. यापुढेही अशाच महत्त्वाच्या भूमिका त्यांना बजावयाच्या असून कोरोना व्हायरसला हद्दपार केल्यानंतर ही अनेक आजार मानवी शरीराला पछाडीत आहेत. त्यामध्ये शुगर आणि हृदयविकार हे आजार मोठ्या प्रमाणात बळावत आहेत. नर्सेसला प्रत्येक आव्हान स्वीकारून रुग्णांची सेवा करावी लागते. त्यासाठी आपण सशक्त असणे आवश्यक आहे आणि सशक्त परिचारिका घडविण्यासाठी प्राध्यापकांनी सशक्त राहणे गरजेचे आहे. यावेळी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बडे म्हणाले की, नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून आज जे शिबीर आयोजित केले आहे. त्या शिबिरातून उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना नक्कीच ज्ञानाचा साठा सापडेल. पहिले राष्ट्रीय नर्सिंग क्षेत्रातील चर्चासत्र बीडला होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. उज्वला वनवे यांनी कवितेच्या माध्यमातून नर्सिंग महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. चर्चा सत्र यशस्वी करण्यासाठी नर्सिंग कॉलेजचे सर्व शिक्षक उलका साळवे, प्रतिक जोशी, रोहन जोगदंड, सतीष बोराडे, श्रीमती रोहिनी शिनगारे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. चर्चासत्रात बाहेरून आलेल्या सर्व मान्यवरांनी या चर्चासत्राचे चांगल्या प्रकारे व उच्च पातळीवर केलेल्या आयोजनाबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बडे आणि शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा बेदरे-कुलथे यांचे अभिनंदन करून कौतुक केले.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी