असंघटित क्षेत्रातील मजुरांना न्याय देण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज उभा करू- कडुदास कांबळे
गेवराई (प्रतिनिधी ) दि. 1 जानेवारी 24 - ग्रामीण आणि शहरी भागातील वीटभट्टी मजूर, बांधकाम मजूर, शेतमजूर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही कार्यकर्ते घडवत आहोत. असंघटित क्षेत्रातील मजुरांना न्याय देण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज आम्ही उभा करत आहोत असे प्रतिपादन गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते कडुदास कांबळे यांनी मादळमोही येथील ॲक्शन एड संस्थेच्या वतीने दि. 31 डिसेंबर 2023 रोजी आयोजित केलेल्या "असंघटित क्षेत्रातील कामगारांचे अधिकार" या विषयावर बोलताना मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मादळमोही येथील सामाजिक कार्यकर्ते शेख सिराज आणि ग्रामपंचायत सदस्य आदिल पठाण उपस्थित होते. या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणामध्ये शेख सिराज आणि आदिल पठाण यांनीही त्यांचे विचार मांडले. मादळमोही येथे 31 डिसेंबर 2023 रोजी असंघटित कामगारांच्या अधि...