राष्ट्र सेवा दला तर्फे बाल विद्या निकेतन शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा.
मालेगाव (प्रतिनिधी) - येथील राष्ट्र सेवा दलाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने बाल विद्या निकेतन प्राथमिक शाळा, मालेगाव कॅम्प येथे प्रतिकात्मक कबड्डी सामना खेळून हॉकीपट्टू मेजर ध्यानचंद, तसेच राष्ट्रीय स्तरावरील, उत्कृष्ट कबड्डीपटू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या वेळी राष्ट्र सेवा दल तालुका संघटक सारंग पाठक, जिल्हा संघटक पत्रकार रविराज सोनार, जेष्ठ सेवा दल सैनिक व विद्यापीठ स्तरावराचे खेळाडू अशोक पठाडे, नाशिक जिल्हा संघठक नचिकेत कोळपकर उपस्थित होते.
प्रास्ताविकात नचिकेत कोळपकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिना बद्दल माहिती दिली. मुलींच्या कबड्डी संघाच्या दोन संघाचे नेतृत्व प्रतिज्ञा बोराळे व मेघा शिंदे यांनी केले. स्पर्धा निर्णायक अशोक पठाडे यांनी टॉस उडवून स्पर्धेस सुरवात केली. ३० मिनिटाच्या स्पर्धेत मेघा शिंदे हिच्या संघाने प्रतिज्ञा बोराळेच्या संघातील सर्व गडी बाद करून १७ मिनिटांत सामना जिंकला. सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. चॉकलेट वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सारंग पाठक यांनी सर्वांचे आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बाल विद्या निकेतन मधील शिक्षिका सुरेखा पाटील, प्रतीक्षा सूर्यवंशी, दीपाली पवार, सरला पवार, गायत्री कासवे यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment