बलभिम महाविद्यालयाने उच्च शिक्षणाची गंगा बीड जिल्ह्यातील घराघरात पोहचली
बलभीम महाविद्यालय हे गुणवंत विद्यार्थी घडवणारे शैक्षणिक संकुल आहेः डॉ. एस.बी. सय्यद
बीडः प्रतिनिधी अंकुश गवळी
मराठवाड्यातील उत्तुंग व्यक्तीमत्व मा. मंत्री स्व. विनायकराव पाटील यांच्या पुढाकारातून तसेच बीड जिल्ह्यातील शिक्षणप्रिय नेत्यांच्या सहकार्य ने बीड जिल्ह्यात उच्च शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचण्यासाठी सन 1960 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मा. श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
बीड जिल्ह्याचा मागासलेपणाचा कायापालट करण्यासाठी शिक्षणासारखे प्रभावी साधन ग्रामीण व शहरी भागातील तरूणांना उपलब्ध करण्यासोबतच बीड जिल्ह्यातील गोरगरीब, आर्थिक दुर्बल घटक, शेतमजूर, उसतोड मजूरांच्या मुला-मुलींना अंधारातून प्रकाशापर्यंत पोहचविण्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात मोलाच योगदान देत एक नामांकित महाविद्यालय असा लौकिक बलभिम महाविद्यालयाने जपलेला आहे.
वाड्यावस्त्यावरील मुला- मुलींची शैक्षणिक जडणघडण करुन त्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक घडवावा यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक आजपर्यंत तळमळीने, प्रामाणिकपणे काम करत आहेत. आम्हाला आमचे जे माजी विद्यार्थी प्रशासन, पोलीस प्रशासन, वैद्यक, विज्ञान व तंत्रज्ञान, संशोधन, क्रिडा इत्यादी क्षेत्रात योगदान देत आहेत त्या विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन बलभीम महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष उंदरे सर यांनी केले.
म.शि.प्र. मंडळाच्या बलभीम कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या वतीने दि. 28 ऑगस्ट रोजी प्राचार्य डॉ. वसंत सानप यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते अध्यक्षीय मार्गदर्शनपर बोलत होते. मंचावर प्रमुख उपस्थितीत माजी विद्यार्थी असोसिएशन सचिव डॉ एस.बी. सय्यद, शिवाजी विद्यालयाचे पर्यवेक्षक गिरीश चाळक सर, कर्डीले मॅडम, सुभाष जगतात सर यांची उपस्थिती होती.
आपल्या मनोगतात डॉ एस.बी. सय्यद यांनी महाविद्यालयाने मागील काळात प्रगतीकडे कशी वाटचाल, आम्हाला महाविद्यालयाने एक यशस्वी व्यक्तीमत्व म्हणून मला घडवले तसेच महाविद्यालयाच्या जुन्या ईतिहासाला उजाळा देत महाविद्यालयाबद्दल ऋणानुबंध व्यक्त केले. शिवाजी विद्यालयाचे पर्येवक्षकगिरीश चाळक यानी महाविद्यालयाबद्दल आपल्या बोलताना विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानुन विविध क्षेत्रात नाव कमवणारे असंख्य विद्यार्थी या महाविद्यालयाने घडवून खऱ्या बीड जिल्ह्यात शिक्षण क्रांती घडवून आणण्यासाठी बलभीम महाविद्यालयाने खुप मोठ योगदान दिले आहे आणि पुढेही योगदान देत राहिले हा विश्वास व्यक्त करत, आपल्या ला त्यावेळी शिकवणारे प्राध्यापक किती तळमळीने शिकवत होते त्या प्राध्यापकांबद्दल च्या आठवणी जागवल्या. याप्रसंगी अनेक मा.विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाचे ऋण व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कलासवासी विनायकराव पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार पण करून करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ.बीटी ताटे यांनी केली सूत्रसंचालन गणित विभागप्रमुख डॉ.ए.डी. चिंधे यांनी केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक एस.ए. सुरवसे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रसायनशास्त्र विभागातील डॉ. एम.ए.साखरे, डॉ. ए.के.आघाव, प्रा. वाय.एन.भराटे, डॉ. एस.बी.खामकर, प्रा. पी.डी. जावळेपाटील,डॉ. ए.बी.दन्ने भौतिकशास्त्र विभागातील डॉ. किर्ती देसाई, प्रा. जी.बी. भोसले, एन.एस.शिंदे, वनस्पती शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सुक्ते मॅडम, डॉ. सुनीता भोसले, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रमोद रोकडे तसेच कॉम्प्युटर विभाग, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग व इलेक्ट्रॉनिक विभागतील सर्व सीएचबी प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. माजी विद्यार्थी मेळावा साठी विज्ञान शाखेतील विविध क्षेत्रात अनेक माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
Comments
Post a Comment