अजिंठा ग्रामीण रुग्णालयाचे होणार उपजिल्हा रुग्णालय



 कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश; 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे विशेषबाब म्हणून होणार 50 खाटांचे श्रेनिवर्धन

मुंबई, (प्रतिनिधी, ता. 29) : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड - सोयगाव विधानसभा मतदारसंघातील अजिंठा येथे सध्या ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र हे ग्रामीण रुग्णालय पुरेसे नाही. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ३० खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून त्याचे पन्नास खाटांचे उप जिल्हारुग्णालय करण्यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाला कळविले होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजिंठा ग्रामीण रुग्णालयास 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास आरोग्य विभागाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच या कामात सुरुवात होणार आहे.

 इमारत अत्याधुनिक व्हावी असा कृषीमंत्री सत्तारांचा मानस...

 सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्या ठिकाणी सुसज्ज आणि अत्याधुनिक रुग्णालयाची इमारत बांधण्याचा मंत्री अब्दुल सत्तार यांचा मानस आहे. ग्रामीण रुग्णालयाचे श्रेनिवर्धन होऊन त्याचे ५० खाटा॓चे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्याची कृषिमंत्री सत्तार यांनी मागणी केली होती. आरोग्य विभागाने त्याला मान्यता दिल्याने मंत्री सत्तार यांचा मानस पूर्ण होणार आहे.



 अनेकांचे वाचणार प्राण......

 औरंगाबाद - जळगाव महामार्गावर अनेक अपघात होतात. या अपघातातील जखमींना योग्य वेळी इलाज न मिळाल्याने त्यातील अनेक जखमींना प्राणही गमवावे लागतात. मात्र अजिंठ्यात अत्याधुनिक आणि सुसज्ज अशी उप जिल्हा रुग्णालयाची इमारत लवकरच उभी राहणार आहे. त्यामुळे अनेक जखमींचे प्राण वाचण्यात या उपजिल्हा रुग्णालयामुळे मदत होणार आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी