विठ्ठल खातळे यांची सांजेगाव-नांदडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड


ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- (नवनाथ गायकर यांजकडून)-इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव-नांदडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेना शाखाप्रमुख विठ्ठल खातळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
   सरपंच निताताई शंकर गोवर्धने यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्यात आली होती.
    या अगोदर सदस्यांत ठरलेल्या समझोता प्रमाणे विद्यमान उपसरपंच यांचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांनी स्वखुशीने राजीनामा दिला होता.त्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते.
   या पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत विठ्ठल खातळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड ग्रामपंचायत कार्यालयात झाल्याची सरपंच निताताई शंकर गोवर्धने, ग्रामसेवक पाटिल यांनी घोषणा केली.
   यावेळी सदस्य मुक्ताबाई गोवर्धने, सिंदुबाई काळे, मंगेश शिंदे, इंदुबाई गोवर्धने, माचिंद्र गोवर्धने, तानाजी सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
बिनविरोध निवडणुक झाल्यानंतर सदस्य आणि ग्रामस्थांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन विठ्ठल खातळे यांचा सत्कार व अभिनंदन केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
   यावेळी केरू गोवर्धने,शंकर गोवर्धने, खंडू गोवर्धने, नंदू गोवर्धने ज्ञानेश्वर खातळे, भाऊसाहेब खातळे, दशरथ खातळे, रामदास खातळे, संपत खातळे, योगेश खातळे, दौलत खातळे, पुंजा खातळे, दिनकर खातळे, सचिन खातळे, सागर खातळे, खंडू खातळे, सागर केरू खातळे , रामदास गोवर्धने, नंदू गोवर्धने, विजय गोवर्धने, कैलास गोवर्धने आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


 ग्रामपंचायत सदस्यांना सांजेगाव व नांदडगाव दोन्ही गावातील जेष्ठ नागरिकांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणारी विकासकामे ,प्रलंबित कामे गावातील रस्ते ,पाणी योजना, स्वच्छता, गटार योजना ही कामे अग्रकमाने हाती घेऊन स्वच्छ गाव व सुंदर गाव करण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करेल.

विठ्ठल गहीणीनाथ खातळे
नवनिर्वाचित उपसरपंच

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी