इतिहासामध्ये लक्षात राहतील असे प्रकल्प राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात निर्माण करावे - छगन भुजबळ
देश अखंड राहण्यास महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महत्वाचे - छगन भुजबळ
मुंबई,दि.२५ ऑगस्ट:- जगात सर्वात जास्त विविधता, जाती, धर्म, पंथ असलेला भारत हा आज पर्यंत अखंड राहीला. ज्यामुळे हा देश अखंड रहिला तो केवळ ‘हा भारत देश सर्वांचा आहे हे विचार’ आणि याचे सर्व श्रेय महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्याला द्यावेच लागेल असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त मांडण्यात आलेल्या अभिनंदन ठरावावर त्यांनी सभागृहात आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हा एक खंडप्राय देश रहावा यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वांना अभिवादन करावे लागेल.
भारत हा “भारत” कसा झाला हे समजुन घ्यावे लागेल त्यासाठी इतिहासात देखील थोडे डोकवावे लागेल.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना "हर घर तिरंगा " हा उपक्रम राबविण्यात आला तो राबवित असताना सरकारने सांगितले की भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विवीध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झंडा हा उपक्रम राबववण्यात येत आहे. मग ते स्वातंत्र्य नेमक काय आणि १९४७ पर्यंतच नाहीतर स्वातंत्र्यानंतरचा कालखंड देखील आपण समजुन घेतला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
देशाच्या या स्वातंत्र्यात महात्मा गांधी,नेताजी सुभाषचंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर,पंडित जवाहरलाल नेहरू,खान अब्दुल गफार खान,विनोबा भावे, जे. बी. कृपलानी,लोकमान्य टिळक,चक्रवर्ती राजगोपालाचारी, सरदार वल्लभभाई पटेल, पं. मदन मोहन मालवीय,डॉ. राजेंद्र प्रसाद, देशबंधु चित्तरंजन दास नारायण, साने गुरुजी, राजाराममोहन रॉय, क्रांतिसिंह नाना पाटील, लाला लजपतराय,झाशीची राणी लक्ष्मीबाई,दादाभाई नौरोजी, सी. एन. अण्णादुराई,शेख मुजीबूर रेहमान,स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ बाबासाहेब आबेडकर, तात्या टोपे,लोकनायक जयप्रकाश यांच्यासह अनेक ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्य वीरांनी आपले आयुष्य हे या देशासाठी अर्पण केले असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, हिंदुस्थान हे एक राष्ट्रच नाही असंख्य जातिजमाती, विविध धर्म आणि नाना भाषा बोलणाऱ्यांचा तो एक खंडप्राय भूभाग आहे.
भारतातून पाय काढताच ब्रिटिशांनी संस्थानिकांना स्वतंत्र राहण्याची मुभा देऊन या देशाचे तुकडे कसे होतील, याचीच तरतूद केली होती. मात्र सरदार पटेल यांच्यासारखा करारी आणि पोलादी गृहमंत्री लाभल्याने ब्रिटिशांचे सारे मनसुबे उधळले गेले.सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे एक कणखर व्यक्तिमत्त्व! भारताचे पोलादी पुरुष अशी प्रतिमा असणा-या पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर देशातील ५६५ संस्थांचे कोणताही रक्तपाताशिवाय विलीनीकरण करून सामर्थ्यशाली आणि एकसंध भारत घडवला.स्वातंत्र्यानंतर संस्थाने खालसा होऊन एकसंध भारत निर्माण होण्यास कमीत कमी १५ वर्ष लागतील,’ असा अंदाज क्रिप्स नावाच्या ब्रिटिश अधिका-यांनी बांधला होता. मात्र सरदारांनी केवळ १५ महिन्यांच्या कालावधीत ही किमया केल्याने ब्रिटिशांना तो मोठा धक्का होता.फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
ते म्हणाले की, मुळात जेंव्हा देश स्वातंत्र झाला त्यावेळेस नेहरुंना पंतप्रधान पदासाठी ज्यांनी पाठींबा दिला त्यात वल्लभभाई पटेल होते. आणि ज्यावेळेस देशातील सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या त्यावेळीस मुळात दुर्दैवाने वल्लभभाई यांचे निधन झाले होते. हा इतिहास जनिवपूर्वक दडवला जातो असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, १४ नोव्हेंबर १९४९ रोजी नेहरूंवरील गौरवपर ग्रंथाच्या प्रकाशनावेळी पटेल सांगतात, लोक आम्हा दोघांना वेगळं करु शकत नाहीत, एवढे आम्ही जवळ आलेलो आहोत. आम्हा दोघांमधलं बंधुतुल्य प्रेम सर्वांना ठाऊक आहे. पंतप्रधान नेहरू हे राष्ट्रासाठी 'आयडॉल' आहेत, जनसामान्यांचे 'हिरो' आहेत. त्यांच्या प्रशंसेकरता माझ्याकडं पुरेसे शब्द नाहीत.सरदार पटेल गेल्यानंतर १५ डिसेंबर १९५० ला नेहरूंनी जे स्टेटमेंट दिलं त्यात म्हटलं आहे: " शेजारी बसून आम्ही दोघांनी किती काळ एकत्र व्यतीत केला, हे तुम्हाला ठाऊक आहेच. मी या रिकाम्या बाकाकडे पाहीन तेव्हा माझं एकटपण अधिक दाटून येईल. मी एकटा पडलो आहे, उदासीची पोकळी जाणवते आहे. आपण आपल्या स्वातंत्र्य चळवळीतला मोठा 'कॅप्टन' गमावला असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
ते म्हणाले की, आपले पहिले पंतप्रधान पंडित नेहरू ९ वेळा तुरुंगात जाऊन अनेक वर्ष त्यांनी तुरुंगात घालवले.त्यांच्या कारावासात या अनोख्या विद्वानाने जगाचा आणि भारताचा इतिहास लिहिला आणि अनेक पुस्तके आपल्याला भेट म्हणून दिली.प्रगतीविज्ञान चरितार्थ करणारे अनेक विकासकामे त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केले आहेत.गेली ७५ वर्षे पंडितजीं शिवाय स्वातंत्र्याचा इतिहास आणि स्वतंत्र भारत घडवण्याचा इतिहास अपूर्ण आहे असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की, भारताचा स्वातंत्र्याचा लढा काँग्रेसने उभारला. भारताच्या स्वांतत्र्यानंतरचा ९० टक्के विकास हा काँग्रेसने केला आहे.१९४७ ला जेंव्हा हा देश स्वतंत्र झाला तेंव्हा काय परिस्थीती होती. देशाचे दोन भाग झाले होते. जातिय हिंसाचार सुरु होता ही सगळी इंग्रजांची देण. त्यामुऴे अश्या परिस्थीतीमध्ये नेहरुंना हा देश पुढे घेऊन जायचा होता आणि हे आवाहन नेहरुंनी पेललं.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सर्वात मोठे योगदान जर कोणते असेल, तर या देशाला त्यांनी लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ लाभू दिला. स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणाला अतिशय योग्य असा आकार दिला. भारताने तटस्थतेचे धोरण स्वीकारले, त्याचे प्रणेते हे केवळ नेहरूच आहेत. त्या वेळच्या परिस्थितीत अमेरिकेच्या बाजूने जाणे योग्य ठरले नसते आणि तेव्हा कम्युनिस्ट असलेल्या सोव्हिएत युनियनच्या गटात जाऊन बसणे आत्मघाती ठरले असते. नेहरूंनी स्वत:चा स्वतंत्र अलिप्त गट तयार केला, ज्याला तेव्हा इजिप्तचे गमाल अब्दुल नास्सेर, इंडोनेशियाचे नेते सुकार्नो, घानाचे नेते एनक्रुमा, तेव्हाच्या युगोस्लाव्हियाचे मार्शल टिटो यांनी तसेच इतरांनी पाठिंबा दिला. परराष्ट्र राजकारणातले नेहरूंचे हे स्थान भल्याभल्यांनी मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, भारतात स्वातंत्र्योत्तर काळात दारिद्रय, निरक्षरता, अन्नधान्याची टंचाई, प्रचंड सामाजिक व आर्थिक विषमता असतांनादेखील भारताला नवसमाज निर्मितीचे स्वप्न देणारे आणि प्रत्यक्षात नवसमाज निर्मितीच्यादृष्टिने कृतीशील प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून भारताचे प्रथम पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याकडे पाहिले जाते.
पंडीत नेहरू यांच्या आधुनिक विचारांचा, त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, नेतृत्व व कर्तृत्वाचा भारताच्या जडणघडणीत निश्चितच सिंहाचा वाटा आहे. पंतप्रधानपदी असतांना आधुनिक भारताच्या राजकारणारवर सर्वाधिक छाप पाडुन भारताला योग्य दिशा देण्याचे कार्य पंडीतजींनी केले.
नवस्वतंत्र भारतासमोर फाळणी,कर्जाचा डोंगर,सततचा दुष्काळ व अन्नधान्याची टंचाई,संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न, दारिद्रय, निरक्षरता, सामाजिक व आर्थिक विषमता इ. विविध समस्यांचा डोंगर उभा असतांना स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी खंबीरपणे भारताचे नेतृत्व केले असल्याचे त्यांनी सांगितले.
१९५० मध्ये भारतात नियोजनातुन विकास करण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. नेहरू हे नियोजन आयोगाचे प्रथम अध्यक्ष होते . पंचवार्षिक योजनांमुळे भारताच्या परकिय चलनात वाढ झाली, पर्यायाने भारताची अर्थव्यवस्था सावरण्यास चांगलीच मदत झाली.
ग्रामीण जीवनाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे , तेथील जनतेच्या दृष्टिकोणात बदल निर्माण करणे हे पंडीत नेहरूंनी सुरू केलेल्या ' समुह विकास योजनेचे उद्दीष्ट होते. मानवतावादी दृष्टिकोणातून पंडीत नेहरूंनी निःशस्त्रीकरणाचा स्विकार केला. पंडीत नेहरूंनी संसदेत अणूऊर्जा विधेयक सादर करून भारताच्या आण्विक कार्यक्रमाला अंतिम स्वरूप दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, भारतीय संविधानाची निर्मिती,परराष्ट्र धोरणाची निर्मिती ,पंचवार्षिक योजनांची अंमलबजावणी,मिश्र अर्थव्यवस्थेचा स्विकार, ग्रामविकास,आण्विक धोरण , कृषी विकास, आरोग्य सुविधा, विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास यासह विविध क्षेत्रात भारताला सक्षम बनवण्यात पंडीतजींची भूमिका महत्वपुर्ण ठरली असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, देशात नेहरूंनी काय केले असा प्रश्न जेंव्हा उपस्थित केला जातो तेंव्हा मला सांगावेसे वाटते कि या देशात आय आय टी , आय आय एम, इस्रो भाक्रा-नांगल धरण, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, एलआयसी, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अश्या सुमारे ७५ पेक्षा जास्त मोठ्या संस्था ह्या नेहरूंनी उभारल्या असे सांगत
चैन ओ अमन का देश है मेरा, इस देश में दंगे ना होने दो
लाल हरे में मत बांटो, इसे शान ए तिरंगा रहने दो या पंक्तीतून आठवणींना उजाळा दिला.
ते म्हणाले की, इंदिरा गांधी
भारताच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला प्रधानमंत्री व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या केंद्रबिंदु सुध्दा होत्या.
लालबहाद्दुर शास्त्रीजींच्या निधनानंतर इंदिराजींची पंतप्रधानपदी निवड झाली. भारताच्या नकाशावर प्रथम महिला प्रधानमंत्री होण्याचा सन्मान मिळाला.
त्यांनी अन्नधान्य,बँकांचं राष्ट्रीयीकरण,
संस्थानिकांचे भत्ते थांबविणे,
हरित आणि श्वेत क्रांती
अणू कार्यक्रम,पाकिस्तानविरुद्ध युद्ध आणि बांग्लादेशची निर्मिती
गरिबी हटवा,
ऑपरेशन ब्लू स्टार यासह महत्वपूर्ण निर्णय घेऊन देशासाठी योगदान दिलं.
ते म्हणाले की, राजीव गांधी पंतप्रधान असताना माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासाची योजना आखल्यानेच सध्या देशात या क्षेत्रात क्रांती होत आहे.
भारताला संगणक युगात आणण्यासाठी धडपणारा हा तरुण नेता भारतीयांच्या मनात अढळ स्थान निर्माण करुन गेला.या क्षेत्राचा वापर करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यामुळे मोदींनी पंतप्रधान झाल्याचे श्रेय राजीव गांधींना दिले पाहिजे.
आधुनिक भारताच्या विकासामध्ये स्व. राजीव गांधींचे योगदान’ अतिशय महत्वाचे आहे.राजीव गांधींनी महिलांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्ष्मीकरण करण्याचे काम केले आहे. या देशातील तरुणांना मतदानाचा हक्क देण्याचे आणि त्यांच्यासाठी विविध योजना आखण्याचे काम राजीव गांधी यांनी केले आहे. त्यामुळे देशातील युवावर्ग प्रगती करीत आहे.
राजीव गांधी यांनी घेतलेले हे निर्णय आपण कधीच विसरु शकणार नाही. मतदान करण्याची वयमर्यादा कमी केली.संगणक क्रांती,पंचायतीराज व्यवस्थेचा पाया, नवोदय विद्यालय,
NPE ची घोषणा, दूरसंचार क्रांती घडविली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मनमोहन सिंह -
भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते डॉं. मनमोहन सिंह यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यात महत्वपूर्ण भुमिका त्यांनी निभावली आहे.
देशात झालेल्या आर्थिक सुधारणांचे खरे सूत्रधार म्हणून मनमोहन सिंह ओळखले जातात.
मनमोहन सिंग हे भारतातच नव्हे तर जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञामध्ये गणले जातात.
मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात जगात आर्थिक मंदी असताना देखील त्यांनी भारतात मात्र मंदी जाणवू दिली नाही. भारत हा कृषिप्रधान देश आहे.
मनमोहन सिंग यांनी भारतीय उद्योगांसह शेतीची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. देशाच्या सिंचन व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक आहे, त्यामुळे अपेक्षित प्रगती झाली नाही, परंतु शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल म्हणून पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली.
हैदराबाद' येथून गावांमध्ये रोजगार हमी योजना सुरू झाली. गावांमध्ये रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कारणास्तव, 'ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यक्रम' अंतर्गत देशातील प्रत्येक ग्रामीण बेरोजगारांना वर्षातून १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी
हळवा कवी, संयमी राजकारणी अशी वाजपेयींची ओळख होती. भारताचा अमृत मोहत्सव साजरा होत असताना त्यांची आठवण काढणे देखील महत्वाचे आहे.
अटलजी यांनी परराष्ट्र धोरनात विशेषतः
अमेरिकेबरोबर मैत्रीसंबंध विकसित करण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेबरोबर व्यापार वाढला. द्विपक्षीय संबंध सुधारले. शेजारच्या चीन बरोबरही आर्थिक संबंध विकसित करण्यावर भर दिला. दोन्ही देशांमधला सीमावाद सोडवण्यासाठी चर्चा सुरु केली.पाकिस्तान बरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न
पाकिस्तान बरोबरचा तणाव संपवण्यासाठी वाजपेयींनी विशेष प्रयत्न केले. दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्यासाठी त्यांनी दिल्ली-लाहोर बससेवा सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला. स्वत:हा त्या बसमध्ये बसून पाकिस्तानात गेले. वाजपेयी यांच्या परराष्ट्र धोरणातील तो एक महत्वपूर्ण उत्तम निर्णय होता. देशात यशस्वी अण्वस्त्र चाचणी,कारगिल युद्ध
यासह देशाच्या शिक्षण धोरनात त्यांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
*इतिहासामध्ये लक्षात राहतील असे प्रकल्प राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात निर्माण करावे.या प्रकल्पाची पायाभरणी करावी*
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रूग्णालये आपण निर्माण करणारच आहात त्यांना अमृतमहोत्सवी वैद्यकीय महाविद्यालये असे नाव द्यावे. समृद्धीच्या धर्तीवर कोकण किंवा मराठवाड्याला मुंबई बरोबर जोडणारा आठ पदरी रस्त्याचा प्रकल्प आणि त्या प्रकल्पाला अमृतमहोत्सवी प्रकल्प असे नांव द्यावे. पश्चिमेचे समुद्राला-गुजरातला वाहून जाणारे ८४ टी.एम.सी पाणी. आणि तापीचे वाहून जाणारे १०० टी.एम.सी पाणी अडवण्यासाठी आणि हे पाणी तुटीच्या,दुष्काळग्रस्त मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात विदर्भात वळविण्यासाठी तेलंगणा मधील कालेश्वरम सारखे प्रकल्प करावेत आणि त्यांना अमृतमहोत्सवी जलसंपदा प्रकल्प असे नाव द्यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी यावेळी बोलतांना केली.
Comments
Post a Comment