स्वाभिमानाने राजकारण करण्यासाठी मनसे ची सदस्य नोंदणी करून महाराष्ट्र ला बळ द्या - राजेंद्र मोटे
गेवराई :-गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबई येथील रविंद्र नाट्यगृह येते पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी बैठक घेऊन राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करत ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात केली असून नागरिक व तरुणांनी आपली ऑनलाईन नोंदणी करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ताकद निर्माण करावी असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी केले आहे.
देशासह राज्यात राजकारणाचा बाजार सुरू असताना या सर्वच राजकीय पक्षांच्या विरोधात लढा उभारून युवकांच्या व राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या लढ्यासाठी सक्षम नेतृत्व असलेले मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे यांना बळ देण्यासाठी तरुणांसह नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी करून या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्यासाठी मनसेला बळ देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिक व तरुणांनी आपली ऑनलाईन सदस्य नोंदणी करून पक्षाला बळ द्यावे असे आवाहन केले. दरम्यान ही सदस्य नोंदणी ऑनलाईन पद्धतीने असून यासाठी स्कॅनर द्वारे व 8860300404 या नंबर वर कॉल करून देखील मनसे चे प्राथमिक सदस्य होता येणार आहे. तसेच आपली नोंदणी झाल्यानंतर तात्काळ त्याच website वर आपणास पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या सहीचे सदस्य असल्याचे कार्ड देखील मिळणार आहे. या ऑनलाईन नोंदणी बाबत काही अडचण आल्यास खालील मोबाईल क्रमांक - 9422353444 / 9326353444
या क्रमांकावर संपर्क करा असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment