शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा - रामहरी भैया मेटे
बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यात अचानक पावसाने दांडी मारल्याने जोमात आलेली शेतकऱ्यांची पिके पावसा अभावी करपू लागली . कापूस, तूर, सोयाबीन, मका , उडीद, मूग, सूर्यफूल ही पिके वाया गेली . शेतकरी हतबल झाला . शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळण्यासाठी बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा यासंबंधीचे निवेदन शिवसंग्राम नेते रामहरी भैय्या मेटे व शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले .
याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,नेकनूर जि.प गटप्रमुख विनोद कवडे,माजी सभापती ज्ञानेश्वर कोकाटे,ऊसतोड कामगार नेते तथा पंचायत समिती सदस्य बबनराव माने,शिरूर कासार तालुकाप्रमुख माऊली शिंदे,शिरूर तालुका उपाध्यक्ष नामदेव धांडे,ओबीसी आघाडीचे शिरूर तालुका अध्यक्ष शिवराम राऊत,शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे,सोशल मीडियाचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा पंडित शेंडगे,युवक आघाडीचे दत्ता जाधव,शिवसंग्राम शिरूर तालुका संघटक महादेव बहिर,शिरूर तालुका सरचिटणीस कृष्णा परजने,योगेश जाधव,विजय सुपेकर,विश्वास बहिरवाळ व अन्य शिवसंग्राम पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment