राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या गेवराई तालुका बैठकीचे आयोजन

गेवराई -- भगवंत सेवक,दानशूर नेते आदरनिय किसनभाऊ राठोड यांच्या सक्षम नेतृत्वात राष्ट्रीय बंजारा परिषद व गोर धर्मची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी व बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची इच्छा असणारे जिल्हा व तालुका स्तरावरील अभ्यासू आक्रमक निस्वार्थी व धाडसी
पदाधिकारी निवडण्यासाठी रविवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह गेवराई येथे सकाळी ११ वाजता महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे,अशी माहिती राष्ट्रीय बंजारा परिषदेचे गेवराई तालुका अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिली.
या बैठकीत गेवराई तालुक्यातील सर्व तांड्यावरील अडीअडचण प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण हे राहणार असून प्रदेश उपाध्यक्ष जीवनभाऊ राठोड,काठोडा येथील संत रामराव महाराज गडाचे महंत सुंदरसिंग महाराज व आरबीपीचे नुतन बीड जिल्हाअध्यक्ष बाजीराव महाराज राठोड, बीड तालुका अध्यक्ष बाळराजे राठोड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या बैठकीत भविष्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकी बाबतीत सखोल चर्चा करण्यात येणार असून तसेच गेवराई सह बीड जिल्ह्यातील अनेक तांड्यांवर स्वतंत्र ग्रामपंचायत, जोड रस्ते,मतदान केंद्र,स्मशान भूमी,आरोग्य केंद्र,पिण्याचे पाणी,शाळा खोल्यांची कमतरता व्यायामशाळा इत्यादी मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत.या मागण्यांकडे कडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संयुक्त रास्ता रोको,जेलभरो आंदोलन लवकरच उभं करणे गरजेचे आहे.या बाबतीत
तसेच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बंजारा समाजाचे नेते ना.संजयभाऊ राठोड यांच्या सत्काराचे लवकरच बीड किंवा गेवराईत भव्य आयोजन करण्यात येणार आहे
 या संदर्भात देखील सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
   तरी गेवराई तालुक्यातील बंजारा भजनी मंडळ,बंजारा प्रबोधनकार,गोर धर्म प्रचारक, युवक,विद्यार्थी,विविध मंदिरांचे पुजारी,महंत तसेच विविध राजकीय पक्षांचे (बंजारा) पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त कार्यकर्ते सोबत घेऊन बैठकीला उपस्थित राहावे व सुचना,मार्गदर्शन करावे,असे आवाहन ता.अध्यक्ष संजय चव्हाण,हभप मगन महाराज, महंत अनिल महाराज रवि महाराजअचित महाराज, देवराव महाराज, रमेश महाराज,
युवा जिल्हा अध्यक्ष कृष्णा राठोड, ता.सचिव रमेश राठोड, ता.कार्याध्यक्ष पवन जाधव,युवा आघाडीचे अध्यक्ष दत्ता राठोड शामराव पवार,अविनाश राठोड, सचिन जाधव, प्रवक्ते एकनाथ आडे,गोर धर्म मुख्य प्रचारक नामदेव महाराज राठोड,रमेश जाधव,गोरख पवार,प्रदिप आडे शिवाजी राठोड, प्रकाश राठोड यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी