जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांच्या उपस्थितीतशिवसैनिकांचा गेवराईत मेळावा संपन्न



गेवराई ( प्रतिनिधी ) शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांच्या उपस्थितीत दिनांक 24 ऑगस्ट रोजी गेवराई माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा संपन्न झाला.
       मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ एम एस इंदानी तर शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, युवानेते रोहित पंडित, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, जिल्हा संघटक नितीन धांडे, बीड तालुकाप्रमुख गोरखनाथ सिंघन, जिल्हा परिषद सदस्य युवराज डोंगरे पं स सदस्य महादेव औटी, आयुबभाई पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गेवराई तालुकाप्रमुख कालिदास नवले यांनी तर सूत्रसंचालन उपतालुकाप्रमुख दिनकर शिंदे यांनी केले.
यावेळी बोलताना युवा नेते रोहित पंडित म्हणाले की, बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुक्यात शिवसेना आजही मजबूत आहे आणि दिवसेंदिवस ती मजबूत होत राहील. त्यासाठी पक्षाने त्यांच्या पाठीशी ताकद उभा करणे गरजेचे आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्य चिन्ह त्यांना मिळाले असते तर बदामराव पंडित हे प्रचंड मताधिक्क्याने विजय होऊन विधानसभेत शिवसेनेचे आमदार म्हणून दिसले असते. परंतु तसेच झाले नाही. यावेळी मात्र पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी राज्यातल्या 288 जागेवर शिवसेनेकडून स्वतंत्र उमेदवार देऊन विधानसभेची निवडणूक लढवावी. असे झाले तर राज्यातली जनता शिवसेनेचाच भगवा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन केले. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी त्यांच्या या प्रतिपादनास अनुमोदन देऊन, शिवसेनेने राज्यात कोणासोबतही युती किंवा आघाडी न करता विधानसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवाव्यात आणि शंभर आमदार घ्यावेत अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली असून, ही शिवसैनिकांची भावना असल्याचे म्हटले. जिल्ह्यातला शिवसैनिक प्रामाणिकपणे शिवसेना वाढीसाठी आजपर्यंत काम करत आला आहे. परंतु युती झाली तर भाजप उमेदवाराचा आणि आघाडी झाली तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागतो याची आम्हाला खंत वाटते. एकेकाळी कट्टर विरोधक असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांचा गेल्या वेळी शिवसैनिकांना प्रचार करावा लागला आणि आता राष्ट्रवादीची युती झाल्यास पुन्हा आम्ही संदीप क्षीरसागर यांचा प्रचार करायचा काय ? अशी भावना शिवसैनिकांची आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्व जागेवर शिवसेनेने स्वतंत्रपणे लढावे अशी स्पष्ट भूमिका मांडली. जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील बोलताना म्हणाले की, बीड जिल्ह्यात प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, तांड्यावर शिवसेना पोहोचलेली असून, घराघरात शिवसैनिक आहे. येथील शिवसैनिकांची भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालू. विधानसभेच्या निवडणुका लवकरच होतील अशी शक्यता व्यक्त करून, बदामराव पंडित यांना या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचीच उमेदवारी देऊन निवडून आणू अशी ग्वाही दिली. यासाठी शिवसैनिकांनी अधिकाधिक सदस्यांची नोंदणी करावी असे आवाहन केले.
   या मेळाव्यास शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, युवा सेना तालुकाप्रमुख गोविंद दाभाडे, किसान सेना तालुकाप्रमुख सतीश सपकाळ, शहर प्रमुख शेख शेहेदाद, तालुका संघटक गणेश चव्हाण, शेख फत्तु मामू, महादेव खेत्रे, सुभाष घाडगे, हरिभाऊ गलधर, मधुकर आहेर, विलास शिंदे, पप्पू कोठेकर, राजू नाडे, डॉक्टर तौर, गोविंद डरपे, सरपंच अशोक वंजारी, वसंत निकम, अंकुशराव माने, मुकुंद बाबर, बदाम पौळ, भारत मडके, शिवाजीराव चव्हाण, कॅप्टन गिरी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी