प्रेरणादायी व्याख्याते राजेश दिवटे यांना रुबाबदार महाराष्ट्र सन्मान

बीड प्रतिनिधी

 रुबाबदार महाराष्ट्र मीडिया ही सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जीवन प्रवास जगासमोर आणण्याचे काम करते तसेच त्याचा सन्मान करू त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देते. 
रुबाबदार महाराष्ट्र मिडीयाच्या कट्ट्यावर युवा प्रेरणादायी व्याख्याते राजेश दिवटे यांना निमंत्रित करण्यात आले होते या कट्ट्याच्या माध्यमातून दिवटे यांची मुलाखत घेतली व रुबाबदार महाराष्ट्र मीडियाचे संचालक अभिनेते सागर शेलार, प्रसिद्ध निवेदिका वर्षाराणी शालगर यांच्या हस्ते " रुबाबदार महाराष्ट्र सन्मान " देण्यात आला.
राजेश दिवटे हे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभरातील युवकांसाठी प्रेरणादायी कार्य करत आहेत त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधील शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना मोफत प्रेरणादायी मार्गदर्शन केले आहे,आतापर्यंत 55 हाजर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला आहे तसेच त्यांनी झुंज दिव्यांग संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू दिव्यांग बांधवांना मोफत कौशल्य प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन करतात तसेच विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची उभारणी केली आहे राजेश दिवटे यांनी " यश तुमचेच " प्रगतीला पंख नवे " संघर्षाशी दोन हात " झिरो ते हिरो एक प्रवास " या चार प्रसिद्ध प्रेरणादायी पुस्तकांचे लिखाण केले आहे, या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडत आहे याच नेत्रदीपक कामगिरीमुळे सन्मान करण्यात आला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी