गेवराई शहरात पोळा सण उत्साहात साजरा:-शिवराज पवार यांच्या हस्ते तोडले तोरण

गेवराई प्रतिनिधी:-शहरात रीती रिवाजाप्रमाणे बैल पोळा हा सण शास्त्री चौक येथील हनुमान मंदिर येथे गेवराईचे पाटील शिवराज बाळराजे पवार यांच्या हस्ते तोरण तोडून पोळा फोडण्यात आला गेल्या दोन वर्षात कोविडमुळे अनेक सनांवर मर्यादा आल्या होत्या परंतु तब्बल दोन वर्षानंतर यावेळी मात्र पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या बैलाचा पोळा सण उत्साहात साजरा केला.दरम्यान गेवराई शहरातही दि:-26 ऑगस्ट रोजी पोळा हा सन प्रतिवर्षाप्रमाणे रिती रिवाजानुसार मानाचे पाटील युवा नेते शिवराज (दादा)पवार यांच्या हस्ते तोरण तोडून पोळा फोडून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली,यावेळी गेवराईचे पाटील कार्यसम्राट आ.ॲड.लक्ष्मण पवार,तहसीलदार सचिन खाडे,डीवायएसपी स्वप्नील राठोड, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर,युवा नेते आदित्य पवार,पो.नि.रवींद्र पेरगुलवार,मंडळाधिकारी जे.एस.लेंडाळ, तलाठी माणिक पांढरे,नगरसेवक राहुल जीजा खंडागळे,नगरसेवक भगवान घुंबार्डे,पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर,दादासाहेब गिरी,जान मोहंमद बागवान,अरुण मस्के,अजित कानगुडे,भारत गायकवाड,सचिन मोटे,उद्धव मडके,करण जाधव,महेश सौंदरमल,याहीया खान,संजय इंगळे माणिक शेठ बागवान,उद्धव मडके,विठ्ठल मोटे,लक्ष्मण चव्हाण,पप्पू पाटील,अमोल मस्के,गोरख मोटे,जगदीश पवार,सतिष दाभाडे,पप्पू भोसले,विष्णुपंत आतकरे,समाधान मस्के,कृष्णा पाटोळे,दशरथ पंडित व इतर कार्यकर्ते आणि मित्रपरिवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी