शिंदे सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पन्नास हजार मदत द्यावी - राहुल जाधव
पाटोदा (गणेश शेवटी)पाटोदा तालुका हा सतत दुष्काळी व डोंगराळ भाग असल्याने येथील शेतकरी गरीब वर्ग आहे.यावर्षी खरिप पिकात सोयाबीनला गोगलगायने घेरले होते त्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे.त्यात पाऊसाने दांडी मारल्याने पुणा शेतकरी वर्ग संकटात सापडलेली
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे पाटोदा ता. अध्यक्ष राहुल शाहूराव जाधव (पाटील ) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे मागी केली आहे. तालुक्यातील एक महिन्यापासून पावसाने दांडी मारल्याने व तालुक्यात अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने खरीप पिके वाया जाण्याची परिस्थिती उद्भवली असून सोयाबीन उडीद बाजरी पिकांचा फुलोराच्या वेळेसच पावसाने दांडी मारल्याने खरीप पिकांचा फुलोरा जळून गेला असून सोयाबीन शेंगाच्या पापडी होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. सोबतच तालुक्यात गोगलगायी मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे पीक उगवले असता त्यांच अवस्थेत असतानाच नुकसान झाले असल्याने अनेक शेतकऱ्यांना दुभार पेरणी करावी लागली होती. या प्रकरणी उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीची शासनाने तात्काळ दखल घेऊन हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे पहिलेच पाटोदा हा डोंगराळ भाग असल्याने पावसाचे प्रमाण सतत कमी असते त्यामध्ये पाण्याचे कोणतेही मोठे श्रोत उपलब्ध नसल्याने येथील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दयनीय अवस्था झाली आहे. या शेतकऱ्यांना यंदाच्या नुकसानीचे वंचित करून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राहुल जाधव यांनी मागणी केली आहे
Comments
Post a Comment