वडवणी येथील कु. विज्ञाप्ती रंगराव लव्हाळे (ऋचा) इंडिया डान्स पाॅवर मेगा राऊंड , बेस्ट डान्स अवॉर्ड होणार दिल्लीत सन्मानित
वडवणी प्रतिनिधी
इंडिया डान्स पॉवर मेगा राऊंड मध्ये वडवणी येथील ऋचा लव्हाळे ची बेस्ट डान्स ज्युनिअर अवॉर्ड ने होणार सन्मान वडवणी प्रतिनिधी. ओयासिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन च्या वतीने घेण्यात आलेल्या बेस्ट डान्स ज्युनिअर अवॉर्ड साठी वडवणी येथील दहावीत शिकत असलेल्या कु. विज्ञाप्ती ऋचा रंगराव लव्हाळे हीची डान्स मेघा राऊंड मध्ये निवड झाली असून ती लवकरच नाईन एक्स नाईन एक्स या राष्ट्रीय चॅनलवर झळकणार आहे.ऋचा चे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. ओयासीस ग्रूप हा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक गुणी कलावंतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने देश पातळीवर यथोचित सन्मान करत असते. वडवणी सारख्या ग्रामीण भागातून ऋचा ने आपल्या खास शैलीतील नृत्याने देश पातळीवर नाव करून दाखविले.बीड येथे डान्स कोरिओग्रफर सिद्धार्थ अग्रवाल यांच्या कडे ती डान्स चे प्रशिक्षण घेत आहे.इतक्या अल्पवयात तिची अवॉर्ड सोहळ्यात करिता निवड झाल्याने आनंद गगनात मावत नाही.शिक्षक दिनी पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे शानदार समारंभात बेस्ट डान्स ज्युनिअर अवॉर्ड वितरित करण्यात येणार आहे. ऑयसिस ग्रूप च्या सिओ डॉ.सुषमा शेरावत यांनीही ऋचा चे विशेष अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment