बदनापूरात बसस्थानक होणार-आ. नारायण कुचे

बदनापूर तालुका हा १९९२ ला निर्मीत झाला असून तेव्हा पासून बदनापूर तालूक्यासाठी बसस्थानक नसल्याने बाहेर गावाहुन येणाऱ्या प्रवाशांना व तालूक्यातील नागरीकांना प्रवास करण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. या विषयावर मी विधानसभेत २०१६ च्या अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थीत करून शासनाचे लक्ष वेधले होते. प्रलंबित असलेल्या बसस्थानकाच्या जागेविषयी आमदार श्री.नारायण कुचे साहेब यांनी जिल्हाधिकारी श्री.विजय राठोड साहेब यांच्यासह व संबधीत सर्व विभागाच्या अधिकारी यांना घेऊन जागेची स्थळ पाहणी केली, यावेळी संबधीत गट नं २३७ हि जागा शासनाच्या नॅशनल हायवे नियमानुसार योग्य असून या जागेवर बसस्थानक बांधकामासाठी निधी मंजूर करण्याचे ठरले आहे.

यावेळी सोबत उपविभागीय दंडाधिकारी श्री.सानप साहेब, नॅशनल हायवे कार्यकारी अभियंता श्री.बंडे साहेब, उप अभियंता यशवंत जाधव साहेब, जालना परीवहन मंडळाचे जिल्हा नियंत्रण श्री.नेहुल साहेब, तहसीलदार मूनलोड साहेब, कार्यकारी अभियंता सा.बां. कोल्हे साहेब, शाखा अभियंता राठोड साहेब, परीवहन मंडळाचे शाखा अभियंता झाल्टे साहेब, नगरपंचायत ठुबे साहेब, मंडळाधिकारी पाऊलबुद्धे साहेब, बद्रीनाथ पठाडे, हरिचंद्र बाबा शिंदे, जगन्नाथ बारगजे, समीर शेख, बाबासाहेब कऱ्हाळे, सत्यनारायण गिलडा, संतोष पवार, विलास जऱ्हाड, पद्माकर जऱ्हाड, परमेश्वर डाके, सय्यद मुजमिल, भगवान मात्रे, मुस्ताक शेख, सय्यद हैदर आदी कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी