मातोश्री पांदन रस्त्याच्या कामावर मंजूरा ऐवजी जे.सि.बी.मशिद्वारे कामे सरपंच ग्रामसेवकावर चौकशी करून गुन्हे दाखल करा - किशोर नागरगोजे


पाटोदा (गणेश शेवाळे)पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथील मातोश्री पांदन रस्त्याच्याचे दोन कामे चालू असून या दोन्ही रस्त्याचे कामाचे अगोदर हाजरी पत्रक भरुन एकाच रात्री मध्ये दोन्ही रस्ते जे.सि.बी.मशिनने कामे केली आहेत झालेले कामे हे अंदाज पत्रकाच्या दर्शविलेल्या मोजमापा नुसार केलेले नाहीत तसेच योजनेच्या नेमानुसार संबधित रस्त्याचे काम झाली नाहीत संबंधित रस्ता हा पांदन रस्ता नसुन हा वस्ती रस्ता असल्यामुळे प्रशासनाची दिशाभुल करून फसवणूक केली तर रस्त्यावरील हाजरी पटावर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्याच कुटूंबातील नातलग व्यक्ती आहेत.गावातील सर्व सामान्य मजुराला कामा संबधीत कसलीच माहिती देण्यात आलेली नाही. यावरुन वरील सर्व बाबीचे निरीक्षन केले असता संपुर्ण रित्या शासनाची फसवणुक चालु आहे.तरी या कामाचे अंदाजपत्रक, प्रशासकिय मान्यतेसाठी ग्रा.प.ने दिलेल्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती तपासून सर्व बाबींची सखोल चौकशी करुन सरपंच ग्रामसेवाकावर ४२० चा गुन्हा दाखल करुन भरले हजेरीपट लवकरात लवकर रद्द करून कार्यवाही करावी नसता लोकशाही पध्दतीने अंदोलन करण्यात येईल असा इशारा येवलवाडी गावचे येवानेते किशोर नागरगोजे यांनी दिला आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी