राज्यस्तरीय युवा समाजरत्न पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते राजेश दिवटे सन्मानित
बीड प्रतिनिधी
दिव्या शिक्षण प्रसारक मंडळ पुणे यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा 2022 या वर्षाचा राज्यस्तरीय युवा समाजरत्न पुरस्कार यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष तसेच झुंज दिव्यांग संस्थेचे कार्याध्यक्ष ,प्रेरणादायी वक्ते लेखक राजेश दिवटे यांना देण्यात आला.राजेश दिवटे हे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभरातील युवकांसाठी प्रेरणादायी कार्य करत आहेत त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधील शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना मोफत मध्ये प्रेरणादायी मार्गदर्शन केले आहे आतापर्यंत 55 हाजर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला आहे तसेच त्यांनी झुंज दिव्यांग संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू दिव्यांग बांधवांना मोफत कौशल्य प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन करत आहे आहेत तसेच विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची उभारणी केली आहे राजेश दिवटे यांनी " यश तुमचेच " प्रगतीला पंख नवे " संघर्षाशी दोन हात " झिरो ते हिरो एक प्रवास " या चार प्रसिद्ध प्रेरणादायी पुस्तकांचे लिखाण केले आहे, अनाथ मुलांन शैक्षणिक मदत करत आहेत. याच नेत्रदीपक कार्याची दखल घेऊन दिव्या शिक्षण प्रसारक पुणे या मंडळाच्या वतीने गुणगौरव सत्कार समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये IAS ऑफिसर मा.श्री.श्रीकांत खांडेकर साहेब यांच्या हस्ते राज्यस्तरीय युवा समाजरत्न पुरस्कार देऊन प्रेरणादायी वक्ते लेखक राजेश दिवटे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ज्येष्ठ समाजसेवक ह.भ.प श्री. दत्तात्रय (आबा) गायकवाड, आदर्श शिक्षक श्री.केशव कातोरे सर उपस्थित होते या वेळी दिव्या क्लासेस च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक दिव्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक इंद्रजीत भोसले सर, सहसंचालिका सोनाली भोसले मॅडम व त्यांच्या सर्व सहकार्यांनी केले.
Comments
Post a Comment