राष्ट्रीय बंजारा परिषदेची जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर

जिसका दल होता है,उसका ही बल होता हैं

     गेवराई -- राज्यातील दीड कोटी पेक्षा जास्त संख्येने असलेल्या बंजारा समाजाला सामाजिक शैक्षणिक व राजकीय न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तसेच सर्व सोयी सुविधां पासून वंचित असलेल्या महाराष्ट्रातील साडेबारा हजार बंजारा तांडे व वस्त्यांवर जोड रस्ते पिण्याचे पाणी स्मशानभूमी मतदान केंद्र अंगणवाडी आरोग्य केंद्र व्यायामशाळा वाढीव शाळा खोल्या इत्यादी मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भगवंत सेवक आदरनिय किसनभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ताकदीनिशी वाटचाल करीत असलेली बंजारा समाजाची सर्वात मजबूत संघटना राष्ट्रीय बंजारा परिषदेची गेवराई तालुका स्तरिय बैठक शासकीय विश्रामगृह गेवराई येथे आयोजित करण्यात आली होती.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण होते.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष बाजीराव राठोड,महंत सुदरसिंग महाराज,कृष्णा राठोड,बाळराजे राठोड,अमर राठोड उपस्थित होते.बैठकीचे आयोजन गेवराई तालुका अध्यक्ष संजय चव्हाण यांनी केले होते. या बैठकीत बीड जिल्हा व गेवराई तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात आली व खालील कार्यकर्त्यांची नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा अध्यक्ष बाजीराव राठोड,
 जिल्हा उपाध्यक्ष अभिजित राठोड,जिल्हा संघटक साहेबराव राठोड,जिल्हा सल्लागार राजाभाऊ जाधव पाचेगाव,युवा जिल्हा अध्यक्ष कृष्णा राठोड,जि उपाध्यक्ष अमोल राठोड तर गेवराई ता.अध्यक्ष संजय चव्हाण,ता.सचिव रमेश राठोड,ता.कार्याध्यक्ष पवन जाधव,ता.उपाध्यक्ष शामराव पवार जातेगाव,विष्णू भैय्या राठोड प्रसिद्धी प्रमुख तलवाडा, ता.प्रवक्ते एकनाथ आडे,ता. सहसचिव राजेंद्र जाधव,ता. संघटक परमेश्वर राठोड, ता.संघटक हिरामन पवार ता.सल्लागार लिंबा नाईक तांडा, विठ्ठल चव्हाण ता.संघटक पांढरी तांडा,पप्पू चव्हाण सह कोषाध्यक्ष केकत पांगरी तांडा,
युवा आघाडी ता.प्रमुख दत्ता राठोड,ता.उपाध्यक्ष विकास राठोड,ता.कार्याध्यक्ष सुजीत पवार,शोशल मिडिया प्रमुख अविनाश राठोड,ता.संघटक बाळराजे जाधव,ता.संघटक किरण राठोड,गेवराई शहर प्रमुखपदी रामेश्वर अर्जून जाधव,जातेगाव जि.प.गट अध्यक्षपदी मारोती सुखदेव पवार, पाचेगाव जि.प.गट अध्यक्षपदी बंडू राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जिल्ह्यातील बंजारा युवकांचा राष्ट्रीय बंजारा परिषद कडे ओढा असल्याचे या बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे.शेकडों युवक दररोज आरबीपीचे सदस्यता स्वीकारत आहेत."जिसका दल होता है,उसका ही बल होता हैं" व "जिसकी जितनी संख्या भारी,उसकी उतनी भागीदारी" या उक्तीप्रमाणे भविष्यात राष्ट्रीय बंजारा परिषद गोर समाजाचे सर्वाधिक कार्यकर्त्यांचे जाळे असलेली सामाजिक संघटना असेल अशी सर्वदुर चर्चा होत आहे. 
    बंजारा समाजाची धर्मसत्ता मजबूत करुन गोर बंजारा समाजाला राजसत्तेकडे नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष व पक्षप्रमुख राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वाटचालीकडे गांभीर्याने पाहत असल्याची जोरदार चर्चा आहे.  
  भगवंत सेवक,गोर जननायक, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरनिय किसनभाऊ राठोड व बंजारा समाजाचे अभ्यासू आक्रमक व धाडसी नेतृत्व प्रा.पी.टी.चव्हाण यांच्या निस्वार्थी कार्य पद्धतीवर संपूर्ण विश्वास ठेऊन जिल्ह्यातील शेकडो समर्पित कार्यकर्ते लवकरच राष्ट्रीय बंजारा परिषद मध्ये स्वयंस्फुर्तीने प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.तांडा तेथे गोर धर्म व राष्ट्रीय बंजारा परिषदेची शाखा हे अभियान राबविण्यात येणार असून बंजारा समाजाची संघटित ताकद शासन व प्रशासनाला दाखवून देणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष बाजीराव राठोड यांनी दिली.
प्रा.पी.टी.चव्हाण यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे ध्येय धोरणे व आचारसंहिता समजावून सांगितली..
   यावेळी गोर धर्म प्रचारक लक्ष्मण महाराज,अचित महाराज, हरिभाऊ आडे महाराज,मनोज जाधव,
 एकनाथ आडे, प्रकाश राठोड, रविंद्र राठोड,बबन राठोड, आकाश पवार, संकेत राठोड, भारत चव्हाण,अजित पवार, सतिश राठोड, प्रकाश जाधव, पप्पू आडे सह
विद्यार्थी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी