ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवीदारांना न्याय मिळालाच पाहिजे--शिवसेना तालुकाप्रमुख सोपान (काका ) मोरे

​ ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवीदारांना न्याय मिळालाच पाहिजे--शिवसेना तालुकाप्रमुख सोपान (काका ) मोरे

​ शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घामाचा पैसा बुडू देणार नाही..शेवटच्या पैशासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार!"
शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ ) खेडकर
  ​ आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) : 
           आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, शिरूर कासार शहरातील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेसमोरील वातावरण ठेवीदारांच्या आक्रोशानं आणि शिवसैनिकांच्या गर्जनेनं चांगलंच तापलं! ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये फसलेल्या तमाम निष्पाप ठेवीदारांच्या हक्काच्या पैशांसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उग्र निदर्शनं करण्यात आली.
  ​या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुकाप्रमुख आदरणीय सोपान (काका ) मोरे, उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ ) खेडकर आणि पीडित ठेवीदारांनी केले.
​ मुख्य मागण्या सह थेट दिला इशारा अधिवेशनात आवाज उठवणार--- अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 'ज्ञानराधा'चा विषय तारांकित झाला पाहिजे!
​ पैसा परत मिळालाच पाहिजे--फसलेल्या प्रत्येक गरिबाचा, कष्टकऱ्याचा एक-एक रुपया या बँकेतून सुरक्षितपणे परत मिळाला पाहिजे, हीच आमची मुख्य मागणी असल्याचे याप्रसंगी जाहीर केले .
​ सरकारने जबाबदारी घ्यावी--- हे सरकार ठेवीदारांना न्याय देईल आणि त्यांचे पैसे परत मिळवून देईल, अशी आम्ही अपेक्षा करतो.
​ सोपान (काका) मोरे शिवसेना तालुकाप्रमुख यांचा सरकारला थेट इशारा--
​ आज आणि उद्या जर या अधिवेशनात ज्ञानराधा मल्टीस्टेटचा प्रश्न तारांकित झाला नाही तर! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गप्प बसणार नाही? सर्व पीडित ठेवीदारांना सोबत घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल! आमच्या लोकांच्या कष्टाचा पैसा आम्ही असा वाया जाऊ देणार नाही!"​न्याय मिळालाच पाहिजे ठेवीदारांचा आक्रोश मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज दिसून आला .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी