शिक्षक कवी गवाजी बळीद यांच्या दिनविशेष काव्यधारा काव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक कवी गवाजी बळीद यांचा बहुउपयोगी काव्यग्रंथ "दिनविशेष काव्यधारा "नुकताच महाराष्ट्र राज्य एकता फौंडेशनचे संस्थापक जेष्ठ साहित्यिक मा अनंतजी कराड यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते मा कल्याणरावजी नेमाने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असतांना आदर्श मूल्ये जोपासणारी समाजनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांवर ऊठसूठ टिका करणाऱ्या बेताल प्रवृत्तींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा काव्यग्रंथ म्हणजे कवी गवाजी बळीद लिखित "दिनविशेष काव्यधारा " हा काव्यग्रंथ स्वातंत्र्य समता बंधुता न्याय याची शिकवण देणारा असून लेखन पसरून घसरून विसरुन न करता लेखन सामाजिक सांस्कृतिक भान जपून आवरावे लागते असे मत जेष्ठ साहित्यिक अनंतजी कराड यांनी व्यक्त केले . याप्रसंगी प्रसिद्ध कवी द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव बाळासाहेब कोठुळे यांनी दिनविशेष काव्यधारा हा काव्यग्रंथ मौलिक व दुर्मिळ निर्मिती असल्याचे नमूद केले. निसर्गाची राष्ट्राची एकात्मतेची जपणूक करण्याचे आवाहन कवी गवाजी बळीद यांचे काव्य करते . साहित्य निर्मितीचा आनंद हा घरात येणाऱ्या नवजात बालकाच्या आगमनाच्या आनंद समान असतो असे मत जेष्ठ साहित्यिक व नाट्यकलावंत मा सायमन भारस्कर यांनी व्यक्त केले . विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविणे या एकमेव सद्भावनेतून निर्माण झालेला दिनविशेष काव्यधारा हा काव्यग्रंथ संतसाहित्याशी नाळ जोडलेला आहे असे गौरवोद्गार मा कृष्णा महाराज ताठे यांनी आपल्या शुभेच्छा देतांना काढले . सुप्रसिद्ध कवयित्री रचना मॅडम यांनी सोप्या भाषेत शिक्षणातून संस्काराची विचारधारा पेरणारा अनमोल नजराणा असल्याचे सांगितले . विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम पर्यावरणप्रेम जागृत करणारा काव्यग्रंथ असून प्रत्येकाच्या काळजात शब्द शब्द तेवणारा दिनविशेष काव्यधारा हा काव्यग्रंथ असल्याचे मत कवी विठ्ठल सोनवणे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून व्यक्त केले . शिक्षक विद्यार्थीपरायण असावा विद्यार्थी शिक्षकपरायण असावा आणि दोघेही ज्ञानपरायण असावेत आणि दोघांना जुळवून समाज परिवर्तन करणारा महाराष्ट्रापुढे ठेवलेला आदर्शवत काव्यग्रंथ म्हणजे कवी गवाजी बळीद लिखित दिनविशेष काव्यधारा असल्याचे मत संभाजीनगरचे जेष्ठ अधिव्याख्याते मा जालींदर बटुळे यांनी व्यक्त केले . ज्ञानवृद्धीसाठी आणि स्वत्त्व सिद्धिसाठी अभ्यासपूर्ण असणारा काव्यग्रंथ म्हणजे दिनविशेष काव्यधारा असे मत जिल्हा प्रशिक्षण व संशोधन संस्था संगमनेरचे अधिव्याख्याते डॉ.मुकुंद दहिफळे यांनी व्यक्त केले . उमेद वाचन चळवळीच्य व्यासपीठाची महती वाढविणारा दिनविशेष काव्यधाराचा प्रकाशन सोहळा असल्याचे मत बोधेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.शंकर गाडेकर यांनी नमूद केले आमच्या शाळेचा यशस्वी विद्यार्थी प्रसिद्धिपथावर असल्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन चापडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मा दसपुते सर यांनी केले. चंदनाप्रमाणे झिजणाऱ्या शिक्षकाने दिलेला आदर्शांचा सार्थ अभिमान असणारा काव्यग्रंथ म्हणजे दिनविशेष काव्यधारा हा काव्यग्रंथ साहित्यात अभंगाबरोबरच स्थान निर्माण करणारा ठरेल . या काव्यरचनांचा अभ्यासक्रमात समावेश होण्याची इच्छा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक मा.रमेश गोरे यांनी व्यक्त केली त्यात शिक्षक कवी यांच्या शाळेचा गौरव आहे. सदरची संस्कार जोपासना करणारी काव्यकलाकृती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्नवादी असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मा कल्याणरावजी नेमाने यांनी आश्वासीत केले . कार्यकमास मा केंद्रप्रमुख नामदेवराव धायतडक श्रीकृष्ण शेळके मा.शरद चाबुकस्वार चंद्रकांत कर्डक संजय वाघ ज्ञानेश्वर तहकीक सर सादिक शेख सर सर्जेराव निकाळजे सर पर्यवेक्षक संजय दुधाडे सर शरद सुपारे सर किरण गोरे सर लोहकरे सर सामाजिक कार्यकर्ते मा सुरेश घोक्षे हरिश्चंद्र नेमाने भारत नेमाने अंकुश गोरे दत्तात्रय झेंड प्रथमेश नेमाने संपत शेंडगे मच्छिंद्र वैद्य अशोक शेंडगे उमेदियन्स ऋषिकेश राऊत अमोल कांबळे कुंडलिक वडते सुंदर सोळंके अमृत मराठे चंद्रशेखर पाटील संदीप बडे प्रमोदभाई कातकडे प्रवीण शिंदे भारती राजगुरु शिवाजी कोकाटे कनलाल जवरे बाबासाहेब विखे रविंद्र घनवट दादासाहेब चव्हाण मंजुश्री खंडागळे बाबासाहेब हरदास तुकारामजी भगत राजू निकाळजे नंदाताई निकाळजे यांनी उपस्थित राहून कार्यकमाची उंची वाढविली . प्रारंभी सर्वधर्मसमभावचे प्रतिक असलेली ज्ञानेश्वरी भगवद्गीता तुकाराम गाथा रामचरित मानस रामायण कुरआन बायबल छत्रपती शिवराय महात्मा बसवेश्वर राजर्षी छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले महात्मा गांधी हिंदू कोडबिल आणि संविधान हातात घेऊन सजविलल्या बैलगाडीतून ग्रंथ दिंडी काढण्यात आली . कार्यक्रमास बालक पालक विद्यार्थी ग्रामस्थ शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या शेवटी श्यामची आई वाचा आणि जिंका या उपक्रमाचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी विष्णू वाघमारे व पूनम राऊत - वाघमारे यांनी केले . आभार प्रदर्शन चंद्रशेखर पाटील यांनी केले .
Comments
Post a Comment