बीड शहरात मूलभूत सुविधा देण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च व्हावा

बीड शहरात मूलभूत सुविधा देण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च व्हावा

डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह शिष्टमंडळाची बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बीड (प्रतिनिधी)
दि.२२ : बीड नगरपरिषदेला १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग शहराच्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सोमवारी (दि.२२) निवेदनाद्वारे केली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले की, नगर विकास विभागाच्या दि. २४ मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार बीड नगरपरिषदेला १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार २० कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. या निधीचा वापर शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांच्या उभारणीसाठी प्राधान्याने करण्यात यावा. डॉ. क्षीरसागर यांनी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे थकीत वीजबिल भरून अतिरिक्त वीजभार मंजूर करून घेण्याची मागणी केली. यामुळे शहराला पूर्ण दाबाने वीज उपलब्ध होऊन पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच अमृत अटल पाणीपुरवठा योजनेतील अपूर्ण कामे पूर्ण करून सध्या १५-१५ दिवसांनी मिळणारे पाणी ४ ते ५ दिवसांच्या अंतराने उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. शहरातील ज्या भागांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आली आहे; मात्र पाणीपुरवठा होत नाही, अशा भागांसाठी स्वतंत्र सर्वेक्षण करून झोननिहाय अंदाजपत्रके तयार करावीत, अशी सूचनाही निवेदनात करण्यात आली आहे. यासोबतच पाण्याचा पुनर्वापर, नगर परिषदेच्या इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग, बिंदुसरा व करपरा नदीतील पाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर यांसारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेकडे स्वतःची जागा नसल्याने कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी स्वतंत्र डम्पिंग ग्राऊंडसाठी जमीन खरेदी करण्यात यावी, तसेच शहर स्वच्छतेसाठी ट्रॅक्टर, कॉम्पॅक्टर, घंटागाड्या आणि अग्निशमन विभागासाठी अत्याधुनिक वाहने व उपकरणे खरेदी करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी बीड नगरपरिषदेच्या भाजप गटनेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागर, शुभम धुत, नागेश तांबारे, राहुल गुरखुदे, सनी माने, मंगेश धोंगडे, नितीन साखरे, मुन्ना गायकवाड, विठ्ठल गुजर, मिलिंद ठोकळ, सुशील जाधव, ज्ञानेश्वर राऊत आदी उपस्थित होते.


पतंजली योग समितीसाठी ५ एकर शासकीय जागा देण्याची मागणी

पतंजली योग समिती, जिल्हा बीड यांना योग प्रचार-प्रसार, व्यसनमुक्ती केंद्र, निवासी शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी बीड शहरात अथवा शहरालगत ५ एकर शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, अशी स्वतंत्र मागणीही डॉ. योगेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे केली. निवेदनात म्हटले की, पतंजली योग समिती गेल्या १८ वर्षांपासून जिल्ह्यात योग, प्राणायाम, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती जनजागृती तसेच पशू-पक्ष्यांसाठी पाणवठे उभारण्यासारखे सामाजिक उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी पाली, कांवी, अंथरवण पिंपरी, कुरुती पिंपरी, माळापुरी किंवा अन्य उपलब्ध ठिकाणी ५ एकर शासकीय जागा समितीला हस्तांतरित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी