आरक्षण वाचवण्यासाठी 26 जून रोजी चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने उपस्थित राहा; उपवर्गीकरणास विरोध करा – ॲड. तेजस वडमारे

बीड | प्रतिनिधी

अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि उपवर्गीकरणाच्या विरोधात सुरू असलेल्या बीड ते मुंबई लॉंग मार्चचा समारोप शुक्रवार, 26 जून 2026 रोजी दादर येथील चैत्यभूमीवर होणार असून, या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींच्या बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. तेजस वडमारे यांनी केले आहे.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या समारोप कार्यक्रमात राज्यभरातील आंबेडकरी समाजबांधव सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात हा लाँग मार्च काढण्यात आला असून, हा लढा कोणत्याही जातीविरोधात नसून संविधानाच्या तत्त्वांचे संरक्षण करण्यासाठी असल्याचे ॲड. वडमारे यांनी स्पष्ट केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व जातींना एकत्रित घटक म्हणून संविधानात स्थान दिले आहे. या प्रवर्गाचे अ, ब, क, ड अशा उपवर्गांमध्ये विभाजन करणे हे संविधानाच्या मूलभूत भावनेच्या विरोधात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यामुळे आरक्षणाचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व समाजबांधवांनी 26 जून रोजी चैत्यभूमी, दादर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांततापूर्ण पद्धतीने उपवर्गीकरणाला विरोध दर्शवावा, असे आवाहन ॲड. तेजस वडमारे यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी